स्वर्गीय प्रेमचंद मोतीलाल जयंती यांच्या स्मरणार्थ क्षय रुग्णांना दिला मायेचा घास जैन परिवाराचा हाच प्रेमाचा ध्यास

सामाजिक कार्यकर्ते संदीप जैन यांनी आपले वडील स्वर्गीय प्रेमचंद मोतीलाल जयंती यांच्या स्मरणार्थ क्षय रुग्णांना दिला मायेचा घास जैन परिवाराचा हाच प्रेमाचा ध्यास

पीएमजे फाऊंडेशनचा उपक्रम….

पाचोरा, प्रतिनिधी

(अनिल आबा येवले)

पाचोरा येथील पीएमजे फाउंडेशन व प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रेमचंद मोतीलाल जैन यांच्या स्मरणार्थ पाचोरा व भडगाव तालुक्यातील शंभर क्षय रुग्णांना व्हिटॅमिन व पोषण आहार युक्त अन्नाची टोपली देऊन मायेचा घास भरवण्यात आला.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शंभर क्षय रूग्णांना ‘अन्नाची टोपली वाटप ‘ करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ देवेंद्र जायभाये अध्यक्षस्थानी होते. भडगाव रोड भागातील आशीर्वाद हॉल मध्ये झालेल्या ‘अन्नाची टोपली वाटप’ कार्यक्रमास नगर पालिका प्रशासक मंगेश देवरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक, गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार , डॉ. अन्सार शेख, टीएचओ डॉ. समाधान वाघ, डॉ. देवराम लांडे, डॉ. अमित साळुंखे, डॉ. शरद वाणी, डॉ. सागर गरुड, डॉ. दिनेश सोनार, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. विशाल पाटील, स्वतंत्र जैन, पोलीस हवालदार राहुल बेहरे, डॉ. आदित्य मराठे, अशोक संघवी, किशोर संघवी, नेमीचंद बांठीया, प्रदिप मराठे, विजय बडोला, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. प्रशांत रोकडे, समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, प्रा. सी. एन‌. चौधरी, ॲड. नरेंद्रसिंह सूर्यवंशी, किशोर बारवकर, अनिल येवले, किशोर संघवी, नीरज मूणोत, श्रीमती भारती जैन, संदीप जैन ,अमोल जैन, स्वीटी जैन, विपुल जैन आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. प्रेमचंद मोतीलाल जैन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सतीश टाक, नीरज मुणोत, डॉ. स्नेहल शेलार, डॉ. देवेंद्र जायभाये यांची भाषणे झाली.

क्षय रुग्णांना तीन महिने पुरेल एवढे तेल, गहू, दाळ, प्रोटीन पावडर एवढे अन्नपदार्थ असलेली अन्नाची टोपली देण्यासंदर्भात जैन कुटुंबियांची असलेली सामाजिक संवेदना नीरज मूणोत यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या वतीने भारती जैन, संदीप जैन, अमोल जैन, हर्षल पाठक, शरद मराठे, मिलिंद धुळे, हरिष शिरसाठ यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद मराठे, अमोल जैन, संदीप जैन, विपुल जैन, निखिल चौधरी, प्रा. गौरव चौधरी, विजय सोनवणे, चेतन कापुरे, अमित संघवी, सुमित संघवी, स्वीटी जैन, अक्षय जैन, प्रशांत गौड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रूग्णांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सतीश टाक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. एन. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. संदीप जैन यांनी आभार मानले.