प्रकाश रामदास तेली यांनी केला जागतिक विक्रम

प्रकाश रामदास तेली यांनी केला जागतिक विक्रम

(पत्रकार, कवी, व लेखक प्रकाश रामदास तेली यांच्या मतदान जनजागृती (Voter Education and Awareness Campaign ) कार्याची एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद)

जळगाव :- लोकशाही मध्ये मतदानास अनन्यसाधारण महत्त्व असून लोकशाहीचे भवितव्य व देशाची दिशा ही मतदानाने ठरत असते तसेच देशाची गती, आणि प्रगती हे मतदार ठरवत असतात मतदान हे अनमोल असून प्रत्येकाने मतदान करावे, मतदानाचा हक्क समजुन घ्यावा व नेहमी आपला मतदानाचा हक्क बजवावा ह्याकारिता जानेवारी २०२२ पासून आज पर्यंत (मागील १६ महिन्यांपासून) प्रकाश तेली यांचे मतदान जनजागृतीचे कार्य अविरतपणे सुरु आहे

              कार्य जर चांगल्या व निस्वार्थ भावनेने केलेले असेल तर त्याचे परिणाम हे नेहमीच सकारात्मक येत असतात याची प्रचिती प्रकाश तेली यांच्या कार्यातुन होते कारण हे कार्य अत्यंत मोठे असून ते सामाजिक व राष्ट्रीय कार्य आहे  हे कार्य केल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा अन्य काहीच मिळत नाही परंतु देश आपला आहे देशाच्या प्रत्येक गोष्टीचे रक्षण आणि संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून ह्या जबाबदारीच्या भावनेतुनच आपणास काही कर्तव्य देखील पार पाडावे लागतात त्याचा कर्तव्य पूर्ती तुन प्रकाश तेली यांच्या कार्याचा विश्व विक्रम नोंदवला गेला व त्यांच्या कार्याची एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली

प्रकाश तेली यांनी काय केले मतदान जनजागृती कार्य

१)      Twitter वर ७६६ ट्विट केले :- प्रकाश तेली यांनी जानेवारी २०२२ पासून आज पर्यंत (मागील १६ महिन्यात) ७६६ ट्विट केले असून मतदान जनजागृती व मतदानाचे महत्त्व हे लाखों लोकांपर्यंत पोहचले आहे व पोह्चवत आहेत आता देखील त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे प्रकाश तेली यांचे ट्विटर अकाउंट @kaviprakashteli ह्या नावाने आहे आपण ह्यावर सुद्धा त्यांचे कार्य पाहू शकतो आज पर्यंत कोणत्याही सामाजिक जनजागृतीचे काम सलग इतके महीने कोणीही केलेले नाही

२)      वोट (मतदानावर) वर लिहिल्या २०० कविता:- एकाच सामाजिक व राष्ट्रीय विषयावर प्रकाश तेली यांनी २०० कविता लिहिल्या आहेत त्यात वोट-१ चे प्रकाशन २०२२ मध्ये झाले तर वोट -२ चे जानेवारी २०२३ ला झाले त्या दोन्हीं मध्ये एकूण १०० कविता आहेत आता वोट-३ चे कार्य सुरु असून लवकरच वोट-३ पूर्ण होईल व नंतर वोट-४ काव्य संग्रहाचे कार्य हाती घेण्यात येईल असे प्रकाश तेली यांनी सांगीतले

३)       मतदानावर लिहिले ७०० घोषवाक्य:- मतदानाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत व सहजतेने समजावे तसेच मतदान जनजागृती अधिक व्यापक व विस्तृत प्रमाणात व्हावी म्हणून मतदानावर ७०० घोषवाक्य लिहिले आहेत लवकरच याची पुस्तके सर्वाना उपलब्ध होईल असे प्रकाश तेली यांनी सांगीतले

 

४)      मतदानावर गाणे लिहिण्याचा आहे मानस:- निरक्षर मतदार बांधवांना ही मतदानाचे महत्व लक्ष्यात यावे व त्यांनी देखील यात सक्रिय सहभाग नोंदवावा म्हणून मतदानावर गाणे लिहिण्याचा प्रकाश तेली मानस आहे कारण मतदान हे जात पात धर्म किंवा शिक्षणाच्या आधारावर दिलेला हक्क नाही तर तो प्रत्येक भारतीयाचा आधिकार आहे व त्यांना ही मतदान काय आहे ते का करावे कसे करावे अश्या अनेक पैलूंवर त्यांचे लक्ष्य आकर्षित करण्यासाठी मतदानावर गाणे लिहिणार असल्याचे प्रकाश तेली यांनी सांगितले

५)      सात काव्य संग्रह झाले प्रकाशित:- प्रकाश तेली यांचे जानेवारी 2022 पासून आज पर्यंत एकूण 7 काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यात १) सड़क सुरक्षा २) बढ़ती जनसंख्या ३) वोट ४) बालविवाह ५) नदी – भारत की जलधारा ६) किसान ७) वोट-2

६)      5000 पेक्षा जास्त कविता लिहिल्या:- प्रकाश तेली यांनी विविध सामाजिक विषयांवर ५000 पेक्षा जास्त कविता लिहिलेल्या असून त्या एक एक करुन प्रकाशित होत आहेत

७)      6000 पेक्षा जास्त घोष वाक्य लिहिले:- प्रकाश तेली यांनी विविध सामाजिक विषयांवर ६000 पेक्षा जास्त घोष वाक्य (कोट्स) लिहिलेले आहेत

८)      मतदान जनजागृती कार्यास नाही दिली सुट्टी:- काही आपवादात्मक स्थिती व परिस्थिती सोडली तर सलग १६ महिन्यात सोळl सुट्ट्या देखील घेतल्या नाहीत असे प्रकाश तेली यांनी सांगीतले आहे आणि आपण हे सर्व त्यांच्या Twitter वर बघू शकतो

९)      असा रेकॉर्ड नाहीच:- एकाच विषयवार इतक्या कविता आणि इतके घोषवाक्य आजपर्यंत कोणीच लिहिलेले नाहीत तसेच इतके लिहिणे देखील सोपे नाही कारण मतदान जनजागृतीचे कार्य सर्व प्रथम व इतर सर्व कार्य दुय्यम असा प्राधान्य क्रम त्यांनी दिल्यानेच हे शक्य झाले असल्याचे प्रकाश तेली यांनी सांगितले

१०)  काय आहे लेखना मागील हेतु :- मतदान व लोकशाही चे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, शांती, व्यापक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय हित हे ह्या लेखना मागील हेतु असल्याचे प्रकाश तेली यांनी सांगितले

११)  घोषवाक्य आणि कविताच का लिहिल्या:- कविता व घोषवाक्य हे सहज आणि लगेच लक्ष्यात राहतात आणि त्याचा उपयोग फ़क्त तत्कालीन परिस्थिती व घटने पूरता होत नसून ते दूरगामी परिणाम करतात व त्याचा उपयोग हा नेहमी साठी करता येऊ शकतो

१२)  प्रकाश तेली यांचे अनेक मान्यवराकडून कौतुक:- प्रकाश तेली यांच्या कार्याचे मा. पंतप्रधान यांचे कार्यालय, मा. राज्यपाल, मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, अनेक केंद्रीय व राज्य मंत्री यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे

१३)  प्रकाश तेली यांचा जळगांव जिल्हा प्रशासन केला गौरव :- मतदान जनजागृती भरीव कार्य व उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनने त्यांचा गौरव केला आहे

     प्रकाश तेली यांचा संपर्क क्रमांक हा ९८६००४१८५६ & ९५७९१११२२२ हा आहे