“डॉ.मनोज दिलीप पाटील यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव – नॅशनल आयकॉन सन्मान”
पाचोरा – शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. मनोज दिलीप पाटील (नवापूर, जि. नंदुरबार) यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड – 2025’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा नुकताच मलकापूर, बुलढाणा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
डॉ. मनोज पाटील हे B.Pharm, M.Pharm, PhD असून त्यांनी GATE परीक्षेत ऑल इंडिया रँक 155 व 97 पर्सेंटाईल मिळविले आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 20 पेक्षा अधिक संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखालील संशोधन पेपर अमेरिकन तसेच भारतीय शास्त्रज्ञांनी औषधनिर्मितीसाठी उपयोगात आणला. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी प्रेरणा देणे आणि आधुनिक प्रयोगशाळा उभारणे यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन, विद्यार्थी मार्गदर्शन, नवकल्पना आणि संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर हा मानाचा मुजरा देण्यात आला. याआधी देखील सन 2024- 25 मध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून डॉ. मनोज पाटील यांना “आदर्श प्राचार्य” हा सन्मान मिळाला होता.
या सन्मानाबद्दल त्यांचे फार्मसी क्षेत्रात तसेच सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे या सन्मानाने संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सेक्रेटरी या विश्वस्त मंडळाकडून डॉ. मनोज पाटील यांचे कौतुक करत सन्मान करण्यात आला.