चोपडा महाविद्यालयात मा. मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चोपडा महाविद्यालयात मा. मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे मा. मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. के.एन.सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य एस.पी.पाटील, पी.एस.पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.डी.कर्दपवार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक हे हरित क्रांती व श्वेत क्रांतीचे जनक असून त्यांच्या शेती सुधारणा विषयक कार्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी १९७२ च्या दुष्काळाचा प्रतिकार करू शकले. स्व.वसंतराव नाईक यांनी ‘कसेल त्याची शेती’ व ‘ शेती मोडली तर लोकशाही मोडेल’ असा नारा देत त्यांच्या कारकीर्दीत शेती विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बी.एच.देवरे यांनी केले तर आभार श्री.एस.जी.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.