पाचोरा भडगाव रोटरी क्लब अध्यक्ष पदी डॉ. पंकज शिंदे यांची निवड

पाचोरा भडगाव रोटरी क्लब अध्यक्ष पदी
डॉ. पंकज शिंदे यांची निवड

पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव च्या पुढील वर्षासाठी अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर पंकज शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. काल तारीख 29 रोजी झालेल्या रोटरी क्लब च्या बैठकीत पंकज शिंदे यांना रोटरीचा औपचारिक पदभार सोपवण्यात आला

येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव ची महत्वपूर्ण बैठक काल तारीख 29 जून रोजी फंड हाऊस सभागृह पुनगाव रोड पाचोरा येथे संपन्न झाली. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रोटेरियन डॉ. अमोल जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मावळते सेक्रेटरी रोटे. डॉ. गोरख महाजन, नूतन अध्यक्ष रोटे. डॉ. पंकज शिंदे तसेच नूतन सेक्रेटरी रोटे. डॉ. मुकेश तेली मंचावर उपस्थित होते.

ज्येष्ठ रोटेरियन शैलेश खंडेलवाल यांनी बैठकीत प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी रोटरी क्लब परिवारातील गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. यात जे.ई.ई. परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवणारा सिद्धेश शैलेंद्र खंडेलवाल, मानव समाधान वाघ, तसेच एन. ई. ई. टी. परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणारे अर्णव नितीन पाटील, दिपाली प्रल्हाद सोनवणे, आकांक्षा नरेंद्र गवांदे, अनुजा गोपाल चौधरी या रोटरी परिवार पाल्यांचा, त्यांच्या पालकांच्या समवेत सत्कार करण्यात आला.

रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रोटे. डॉ. अमोल जाधव यांनी मागील वर्षाच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांची माहिती सभेपुढे सादर केली. यानंतर नूतन अध्यक्ष रोटेरियन प्रा. डॉ. पंकज शिंदे यांनी आगामी वर्षाचा आपला दृष्टिकोन आपल्या मनोगतातून जाहीर केला. रोटरी क्लबच्या परंपरेनुसार मावळत्या अध्यक्षांनी नूतन अध्यक्ष पंकज शिंदे यांना औपचारीकपणे पदाची कॉलर, चार्टर व हॅमर प्रदान करून क्लबची सूत्रे सोपवली.

रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चा जाहीर *”पदग्रहण समारंभ”* दिनांक 7, जुलै 2023 शुक्रवार रोजी सायंकाळी 08 वाजता, हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडेन्सी हॉल भडगाव रोड, पाचोरा येथे आयोजित करण्यात आल्याचे नूतन अध्यक्ष पंकज शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

रोटरी चे उपप्रांतपाल रो. प्रदीप बापू पाटील व उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर यांनी मागील वर्षाच्या कार्यकारिणीचे कौतुक करून आगामी वर्षाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. रोटेरियन प्रा. शिवाजी शिंदे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले, तर रो. निलेश कोटेचा यांनी आभार मानले. या बैठकीला रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.