युवा सेना तर्फे महाराष्ट्र राज्य महावितरण महामंडळाचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

युवा सेना तर्फे महाराष्ट्र राज्य महावितरण महामंडळाचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

पाचोरा (प्रतिनीधी) शहरात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाचा स्थापना दिनाचे औचित्य साधून पाचोरा शहरातील महावितरण कार्यालय येथे कर्तव्यदक्ष अधिकारी कार्यकारी अभियंता सखाराम थानवी. अती कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण व उपकार्यकारी अभियंता पंचाळ सर सोबात सर्व वायरमन बंधू व कर्मचाऱ्यांचा पाचोरा युवा सेना तर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी युवासेना उप जिल्हा प्रमुख संदीप जैन यांनी सांगितले की महावितरण कर्मचारी रात्री बे रात्री उठून देखील आपल्या जीवाची परवा न करता सेवा देतात आणि आपला समाजाचाही काही देणं लागतं आणि याच हेतूने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श घेऊन 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या बिद्र वाक्याखाली काम करत असून .आपण युवा सेना तर्फे आज महावितरण स्थापना दिवसाच्या निमित्ताने सर्व महावितरण कंपनीचे मनापासून आभार मानतो आपण चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहात यापुढेही असेच काम करत रहा हीच अपेक्षा बाळगतो .यावेळी तालुका प्रमूख भूपेश सोमवंशी, अँड गौरव पाटील,युवा सेना शहर प्रमुख हरीश देवरे, शहर संघटक प्रशांत सोनार, महेंद्र पाटील सचिन खरे ,अनिकेत पाटील ,सचिन पाटील तुषार पाटील , मिलिंद खरे सर्व युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते