Home जळगाव चोपडा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमांतर्गत ‘भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमांतर्गत ‘भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमांतर्गत ‘भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन

 

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमांतर्गत दि. ३० व ३१ डिसें. २०२४ रोजी ग्रंथालयात सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी ‘भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी व समन्वयक डॉ.एस.ए.वाघ यांनी केले आहे.

Don`t copy text!