काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींची चौकशीच्या विरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींची चौकशीच्या विरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन…. .

पाचोरा प्रतिनिधी =
-राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनिया गांधीं यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात येत आहे, त्या विरोधात काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात ठिय्या आंदयोलन करण्यात येत आहे . त्याच्या निषेधार्थ
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनीया गांधी यांची सुडभावनेने चौकशी करण्यात येत आहे . त्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज पाचोरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले .

पाचोरा काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसिल कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. विविध घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, कुसुम पाटील, सुनिता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद मौलाना, शिवराम पाटील, सय्यद ईसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शहा, कल्पेश येवले, राहुल शिंदे आदींनी धरणे आंदोलन मध्ये उपस्थित होते