श्री तीर्थक्षेत्र जागृत खंडेराव महाराज देवस्थान, काकणबर्डी येथे सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

श्री तीर्थक्षेत्र जागृत खंडेराव महाराज देवस्थान, काकणबर्डी येथे सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

पाचोरा- श्री. तीर्थक्षेत्र जागृत खंडेराव महाराज देवस्थान, काकणबर्डी येथे स्वातंत्रदिना निमित्त तीर्थक्षेत्र परिसरात वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी निर्मल सीड्सच्या संचालिका तथा शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ.पाटील यांच्या स्मरणार्थ पारंपरिक पद्धतीने ओटा बांधून त्यात वृक्षारोपण करुन संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. भविष्यात या झाडाखाली येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना निवांतपणे बसता येईल.
याप्रसंगी काकणबर्डी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष
श्री. अजय वाघ, उपाध्यक्ष श्री.पप्पू राजपूत,जयदीप पाटील, रविंद्र शिंदे,सुरेश पाटील,रमजान सय्यद,शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, उपशहर प्रमुख संजय चौधरी,अख्तर अली, मनिषा शिंदे, आशा पाटील माजी सरपंच ओझर
तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.