श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर भडगाव रोड विभाग पाचोरा येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

🌈पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर भडगाव रोड विभाग पाचोरा येथे आज क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर व पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक श्री.गिरीशचंद्र पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.दि.1/12/2022 ते दि. 8/12/2022 दरम्यान विविध मैदानी व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यात 100 मीटर धावणे,बुक- बॅलेन्स,कबड्डी,अडथळ्याची शर्यत,बेडूक उडी,संगीत खुर्ची, लांब उडी,सॅकरेस,वकृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. आज “100 मी.धावणे” ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.