नांद्रा येथे माध्यमिकला जोडून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणार- सचिव काशिददाजी

नांद्रा येथे माध्यमिकला जोडून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणार- सचिव काशिददाजी

नांद्रा ता.पाचोरा(वार्ताहार)
येथील अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे वृक्षारोपण व गुणवँत विद्यार्थी सत्कार समारंभ नुकताच धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को अॉप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता जामनेर चे सचिव मा श्री सतिष चंद्र काशिदसाहेब यांच्या उपस्थित संपन्न झाला.याप्रसंगी नाँद्रा येथील माध्यमिक विद्यालयलातून दरवर्षी दहावीचे १५० च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यातले काही मेरीट ला येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतात पण उर्वरीत ८०%विद्यार्थी कला,वाणिज्य,विज्ञान शिक्षणासाठी शहरी भागात जातात पण काही गरीब विद्यार्थी असतात त्यांना अपडाऊन व मोठी फी भरणे शक्य नसते याबरोबरच ग्रामीण भागातील मुलींना अपडाऊन सोईचे नसल्याने व खर्चीक असल्याने प्रसँगी शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते तरी आपल्या माध्यमिक विद्यालयाला जोडून उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्याची मागणी पञकार प्रा.यशवंत पवार व ग्रामस्थपालकवर्ग यांनी हा विषय संस्थेच्या सचिवाकडे मांडल्यावर त्यांनी हा विषय तात्काळ मान्य करुन विद्यार्थ्यांना गावातच चाँगल्या दर्जेदार उच्चशिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून यावर्षीच दोन नविन खोल्या उभारुण आपण माध्यमिकला जोडूनच उच्च माध्यमिक विद्यालय दर्जावाढ करुन सुरू करण्याचे आश्वासन याप्रसँगी दिले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को अॉप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी महिला संचालिका सौ उज्वलाताई सतिष काशिद.स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ वाय जी पाटील.उपाध्यक्ष विश्वनाथ लोटन पाटील. आत्माराम सिताराम पाटील ‌.विनोद बाबुराव पाटील. सुभाष त्र्यंबक पाटील. नंदकुमार नारायण बागुल.पो पा किरण वसंत तावडे ‌ सरपंच सुपत्र विनोद तावडे.किशोर प्रकाश खैरनार.महेश गवादेसर,वसंतराव माधवराव सुर्यवंशी.ग्रा प सदस्य योगेश रामकृष्ण सुर्यवंशी.पत्रकार राजेंद्र भगवान पाटील.प्रत्रकार यशवंत फुलचंद पवार.साहेबराव वामण तावडे.मनोज भाऊ राव पाटील सखाराम तुकाराम पाटील उपसरपंच शिवाजी रमेश तावडे सुभाष बाबुलाल तावडे,पञकार किरण सोनार ,वसंत बाविस्कर अंगणवाडी सेविका. माजी मुख्याध्यापक डब्लु एस पाटील. श्री.देठेसर,. एस पी तावडेसर.मुख्याध्यापक आर एस चौधरीसर आदी.उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दत्तात्रेय देवतेचे पुजन करुन व आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड यांच्या अधाऀकृति पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आले.
मान्यवरांचे वृक्षारोप व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी यांनी केले.
गुणवंत विद्यार्थी सत्कार
एन एम एम एस( राष्ट्रीय दुबऀल घटक) परीक्षा एकूण १९विद्यार्थी पैकी ०५ विद्यार्थी पास झाले तर ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत पात्र झाले तर एस टी सर्वगांत जळगांव जिल्हात प्रथम क्रमांक कोळी पल्लवी अशोक व आठवा क्रमांक कोळी पायल ज्ञानेश्र्वर , तायडे मयुरी ,संजय बाविस्कर घनश्याम वसंत पास झाले त्यानां मार्गदर्शन करणारे शिक्षक पी एस चौधरी,सौ व्ही एस पाटील, डी एस चव्हान.यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले.
माजी मुख्याध्यापक डब्लु एस पाटील, ग्रामस्थ वसंतराव माधव सुर्यवंशी. पत्रकार यशवंत फुलचंद पवार, यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.व इयत्ता. ११वी कला विज्ञान सुरू करण्याची मागणी केली.
अध्यक्षिय मार्गदर्शन सतिष चंद्र काशिद यांनी अनेक वृक्षसंपदा असलेल्या निसर्गरम्य वातावरणात कार्यक्रम संपन्न होत आहे. मनस्वी आनंद व्यक्त केला.शाळेच्या दोन खोल्या बांधल्या जातील. काही वर्ग खोल्या फरषी बसवन्यात येईल.
विद्यार्थी समोर आज बोलताना आनंद व्यक्त केला कोविड १९पादुऀभावमुळे गुणवत्त विद्यार्थी कौतुक केले. त्यांचा आदर्श इतर विद्यार्थी घ्यावा. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावकरी यांचा उत्तम प्रतिसाद व कार्यक्रमांचे उत्तम नियोजन बदल समाधान व्यक्त केले.
कोणत्याही उपक्रमा मध्ये योग्य मदतीचे आश्वासन दिले.
याप्रसंगी वृक्षारोपण सतिष चंद्र काशिद व महिला संचालिका सौ उज्वलाताई सतिष काशिद, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व अंगणवाडीँच्या सेविकाताई सर्वांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठाकूर यांनी केले व आभार एल एम पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.