पाचोऱ्यात मिठाबाई कन्या शाळेचा निकाल 96%

पाचोऱ्यात मिठाबाई कन्या शाळेचा निकाल 96%

पाचोरा – राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या हायस्कूल चा निकाल ९६.३४% लागला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माध्यमिक व उच्च माध्यमिक मीठाबाई कन्या हायस्कूल मधील एकूण 82 विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 79 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे या वर्षी शाळेच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मधून 13 विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत, तर 54 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. फक्त 12 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणि प्राप्त आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थिनीमधून कु. अस्मिता दशरथ जाधव 83.80% गुण मिळवून प्रथम आली आहे, तर विनिता शंकर रोकडे हि 83.40% गुण मिळवून द्वितीय आणि रूपाली हरी पाटील ही 79.60% गुण मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. महेक सलीम तांबोळी ला 79 टक्के गुण मिळाले असून ती चौथ्या क्रमांकाने तर स्नेहल मनोज साटोटे हिने 77.80% गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील पवार, सेक्रेटरी श्रीमती रूपालीताई जाधव , विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार , पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.