दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा खालावतोय -आ. सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली खंत

दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा खालावतोय!- आ. सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली खंत

– कृतज्ञता व दर्पण पुरस्कार सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी,

परिपत्रक म्हणजे विविध स्तरावरील माहिती किंवा सूचना कळवणारे पत्रक, परिपत्रक हे स्वयंम स्पष्ट असलं पाहिजे, की जे वाचलं तर अडाणी माणसाला सुद्धा परिपत्रकाचा अर्थ कळला पाहिजे. मी स्वतः परिपत्रक लिहिलं आणि हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची सही घेतली. याला अनेक अडचणी व लोकांचा विरोध होता. तरी आपण पाठपुरावा करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत झाले पाहिजे, ही मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी मान्य करून घेतली. त्यानंतर लगोलग शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहून याची तातडीने अमलबजावणी करा, असा निर्देश आ. सत्यजीत तांबेंनी दिला.

जळगाव जिल्ह्यांतील माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत केल्याबद्दल मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता सोहळा व दर्पण पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकार सत्कार सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, सरकारी कामामध्ये एखादे परिपत्रक काढल्यावर त्याची अमलबजावणी होण्यासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागतात. त्याशिवाय त्याची अमलबजावणी होत नाही. तुमच्या आवडीच्या बँकेत खाते उघडा, अशा सुचना दिल्या आहेत. शिक्षकांनी कोणतेही आंदोलन केलं, तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. आज या शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या मोठी अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला विरोधाभास आहे.

एकाच शाळेमध्ये एकच विषय शिकविणाऱ्या चार शिक्षकांना वेगवेगळा पगार आहे. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे. सरकारी शाळेतील सातवीच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही. हीच परिस्थिती सगळ्या शाळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणाचा जो बोजवारा झालेला आहे. यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे, असेही आ. तांबेंनी म्हणाले.