लासगाव सरपंच पदी रामसिंग खैरनार (समाधान पाटील)यांची बिनविरोध निवड

लासगाव सरपंच पदी रामसिंग खैरनार (समाधान पाटील)यांची बिनविरोध निवड

नांद्रा (ता.पाचोरा)ता.३१ लासगाव येथील सरपंच शेख शरीफा यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आज मतदान घेण्यात आले.त्यात रामसिंग उद्देसिंग खैरनार (समाधान पाटील)यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी प्रशांत पगार, तलाठी सुनिल राजपूत, ग्रामसेवक अनिल पगार यांनी काम पाहिले.यावेळी उपसरपंच रेखाबाई महाजन, ग्रामपंचायत सदस्य धनसिंग पाटील,वहिद देशमुख, मनिषा बडगुजर, तेजस्विनी खैरनार, संगिता पाटील, आनंदा पैठणकर, इम्रान शेख,भरत महाजन, गोपाल पाटील, राजेंद्र तायडे, सुनिल पाटील,अकबर बुर्हाण, पप्पू पाटील,करण पाटील, रविंद्र महाजन कर्मचारी बाळासाहेब पाटील, राजेंद्र बडगुजर, अनिल पवार, पोलिस पाटील पंजाब पाटील,राजु नामदेव पाटील,उपस्थित होते.नवनियुक्त सरपंच रामसिंग खैरनार (समाधान पाटील)यांचा नवनिर्वाचित सरपंच पदासाठी निवड झाल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील,जि.प.सदस्य पदमबापु पाटील , पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयसिंह पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या सह असंख्य हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.