पुरुष/महिला महाराष्ट्र आँलिम्पिक खो-खो क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न

पुरुष/महिला महाराष्ट्र आँलिम्पिक खो-खो क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न….!!!!

जळगाव (क्रीडा प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आँलिम्पिक असोसिएशन,द्वारा आयोजित,महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तसेच जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने पार पडणाऱ्या महाराष्ट्र अॉलिम्पिक राज्यस्तरीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा (२०२२/२३) चा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला,१० ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत पुरुष व महिला गटात पार पडणाऱ्या या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल,जळगाव येथे अनुभवास मिळणार आहे,स्पर्धेचे उद्घाटन खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू मा.आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते पार पडले,यावेळी भारतीय खो-खो फेडरेशनचे सहसचिव प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंदजी शर्मा,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गुरुवर्य गणपतराव पोळ,क्रीडा संचालक अनिल चोरमले,क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,जळगाव शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नारायण खडके,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रदीप तळवेलकर,माजी सचिव संदीप तावडे,सहसचिव प्रशांत इनामदार,सहसचिव वैशाली पलांडे,पवन पाटील,सहसचिव जयांशु पोळ,राजेश सोनवणे,नागनाथ गजमल,उदय पाटील,राजेश जाधव,कमलाकर कोळी,महेंद्र गाढवे,श्रीकांत ढेपे,पंच मंडळ सचिव प्रशांत पाटणकर,स्पर्धेचे तांत्रिक संचालक व तांत्रिक समिती सचिव डॉ.नरेंद्र कुंदर आदि उपस्थित होते.
उद्घाटक खो-खो चे माजी राष्ट्रीय खेळाडू तथा मा.आ.चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित खेळाडूंचे उत्साह वाढवणारे मनोगत व्यक्त केले,तर खो-खो फेडरेशन अॉफ इंडियाचे सहसचिव प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव यांनी महाराष्ट्र अॉलिम्पिक असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचे कौतुक केले,भोजन व्यवस्था,निवास व्यवस्था इ.चे कौतुक करुन अशाच स्पर्धा घेण्याचे सातत्य ठेवा असे आवाहन केले.
आज सकाळी वेळापत्रकानुसार सुरु झालेल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी जळगाव शहरातील आर.आर.माध्यमिक विद्यालय,प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडियम स्कूल,ला.ना.सार्वजनिक विद्यालय,रोझलँड इंग्लिश मेडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या शिक्षकांनी सामने पाहण्यासाठी हजेरी लावली,
उपस्थित शाळेतील शिक्षकांचा आयोजकांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
खो-खो स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात मुलांमध्ये चुरशीच्या सामन्यात सोलापूरने उस्मानाबादचा एक गुणांनी (१९-१८) पराभव केला. विजयी संघातर्फे रामजी कश्यप (२-२०, २-०० मिनिटे संरक्षण व ५ गुण), गणेश बोरकर (१-००,१-२० मि. संरक्षण व २ गुण ), सौरभ चव्हाण (१-२० मि. संरक्षण व ३ गुण ), रोहित पोतदार (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर उस्मानाबादतर्फे अनिकेत पवार (१-४०,१-४० मि. संरक्षण व ३ गुण ), श्रीशंभो पेठे (१-५०,१-०० मि. संरक्षण व ३ गुण ), भगतसिंग वसावे (१-४० मि. संरक्षण व ३ गुण ) असा खेळ केला. दुसऱ्या सामन्यात मुंबईने नागपूरचा १ डाव ०४ गुणांनी (१६-१२) पराभव केला. विजयी संघतर्फे वेदांत देसाई (२-२०,१-०० मि. संरक्षण व २ गुण ), निरव पाटील (२-४० मि. संरक्षण व ०१ गुण ), सम्यक जाधव (२-०० मि. संरक्षण व ३ गुण ) यांनी खेळ केला तर पराभूत नागपूर तर्फे ज्ञानेश्वर राजूरकर (१-२० मि. संरक्षण व ३ गुण ) याने एकाकी लढत दिली. मुली गटात नाशिक ने मुंबई चा ०१ डाव ५ गुणांनी (१०-०५) असा खेळ केला. त्यात नाशिकतर्फे निशा वैजल (०३-५० मि. संरक्षण ), मनीषा पडेर (०३-५० मि संरक्षण ) सोनाली पवार (०२-४० मि. नाबाद संरक्षण ), ऋतुजा सहारे (३ गुण ) यांनी चांगला खेळ केला. मुंबईतर्फे मधुरा पेडणेकर (०१-२० मि. संरक्षण व ०१ गुण ), रिद्धी कबीर (१-२० मि. संरक्षण ), श्रिया नाईक २ गुण ) यांनी लढत दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,क्रीडा अधिकारी तथा एकलव्य पुरस्कारप्राप्त माजी राष्ट्रीय खेळाडू गुरुदत्त चव्हाण,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील,दिलीप चौधरी,दत्तात्रय महाजन,अनिल माकडे,सुशांत जाधव,प्रेमचंद चौधरी व इतर आजी-माजी खेळाडू मेहनत घेत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी तसेच सुत्रसंचालन सुजाता गुल्हाणे आणि आभार जयांशु पोळ यांनी मानले.