सत्कार व निरोप समारंभ पाचोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक- माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीने आयोजित

सत्कार व निरोप समारंभ पाचोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक- माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीने आयोजित

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा.तात्यासो.विकास पाटील साहेब,पाचोरा गटसाधन केंद्राचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मा.दादासो.एन.एफ.चौधरी साहेब यांच्या सत्कार समारंभाचे व गट साधन केंद्राच्या विस्ताराधिकारी श्रीमती.सुलोचना साळुंके मॅडम यांच्या सेवापुर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्यावतीने युवा नेते तथा पं. स.सदस्य,पाचोरा भैयासो.ललित वाघ यांनी नवनियुक्त मा.शिक्षणाधिकारी यांचा सत्कार केला व श्री.दीपक पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्यात.🌈 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार आप्पासो किशोर पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.जळगावचे गटनेते मा.रावसाहेब पाटील,जि. प. सदस्य भाऊसो. मधुकर काटे,माजी पंचायत समिती सभापती मा.सुभाषभाऊ पाटील, पंचायत समिती सदस्य भैयासो. ललित वाघ,सत्कार मूर्ती नवनियुक्त शिक्षणाधिकारी तात्यासो. विकास पाटील, पाचोरा गटसाधन केंद्राचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी दादासो.एन.एफ. चौधरी,निवृत्त विस्ताराधिकारी ताईसो. सुलोचना साळुंखे,पाचोरा गटसाधन केंद्राचे विस्ताराधिकारी अण्णासो. समाधान पाटील, विस्ताराधिकारी मा.सरोज गायकवाड मॅडम व तसेच विविध प्राथमिक-माध्यमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतात आपला जीवनपटासोबत शिक्षक असतांना व गटशिक्षणाधिकारी पदी असताना केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रापती आस,ध्यास आणि कास धरून न्यावी हे आवाहन समस्त शिक्षक वर्गास करून केलेल्या सहकार्या व सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शिक्षणाधिकारी पदाचा आपल्या जिल्ह्यास जास्तीत जास्त लाभ कशा पद्धतीने देता येईल याचे आश्वासन दिले.तसेच नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी व निवृत्त विस्ताराधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे शिक्षकांमधून जि.प. शाळेचे श्री.प्रदिप जाधव सर व श्री.सु.भा.पाटील शाळेचे श्री.दीपक पाटील सर तसेच प्रमुख पाहुण्यामधून माजी सभापती श्री. सुभाष पाटील श्री.मधुभाऊ काटे व कार्यक्रमाचे मा.अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्यात.