पोलिसांनी दोन तासात शोधली हरवलेली दुचाकी

पोलिसांनी दोन तासात शोधली हरवलेली दुचाकी

मुखतार इमान पिंजारी राहणार संभाजीनगर पाचोरा हे न्यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाचोरा येथे मुख्याध्यापक आहे. रविवार रोजी ते मतदान प्रशिक्षण घेण्यासाठी गो .से .हायस्कूल पाचोरा येथे आले असता. त्यांनी तिथेच आपली दुचाकी उभी केली. परीक्षणातून परत आल्याने त्यांनी आपली गाडी तिथे पाहिली तर गाडी नाही होती त्यांनी शाळा व त्याचे परिसरात दुचाकीचा शोध केला परंतु गाडी मिळाली नाही. हरवलेली गाडी बाबत त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली व दोन तासाचे आत दुचाकी शोधून काढली. चोरट्यांनी ती दूचाकी पाचोरा न्यायालय समोर सोडून ते फरार झाले होते. पोलिसांनी MH -19 EC -2902 शाईन होंडा ही गाडी मूळ मालकाला दिली. या कार्यामध्ये psi गुलाबराव मनोरे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, गजानन जोशी, पोलीस नाईक पवन पाटील यांनी आपली भूमिका राबवली. ह्या कार्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची संघटना शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांनी, व शेख जावेद रहीम यांनी कॉर्डिनेट केले.