महाराजा अग्रसेन जयंती निमित्त वैशालीताई सुर्यवंशी यांनी शोभायात्रेचे केले स्वागत

महाराजा अग्रसेन जयंती निमित्त वैशालीताई सुर्यवंशी यांनी शोभायात्रेचे केले स्वागत

पाचोरा: श्री श्री 1008 महाराजा अग्रसेन जयंती निमित्ताने पाचोरा येथे आज दिनांक 15/10/2023 रोजी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शहराचे सर्व अग्रवाल समाज बांधव यांच्या सह शहरातील नागरिक या शोभायात्रेत उपस्थित होते. या पवित्र वातावरणात पाचोरा भडगाव मतदार संघाच्या शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शोभेयात्रेचं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे मनापासून स्वागत केले व यात्रेत सामील सर्व भाविकांसाठी दूध वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आणि सर्व समाज बांधव आणि नागरिकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या या शुभप्रसंगी शहरवासी आणि समाज बांधव सह पक्षाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.