शेतातील जळालेली डीपी बदलून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५००रू. लाचखाणारे विज अधिकारी अँटीकरप्शन च्या सापळ्यात ‌

शेतातील जळालेली डीपी बदलून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५००रू. लाचखाणारे विज अधिकारी अॅंटीकरप्शन च्या सापळ्यात अडकले ! ‌

(सुनिल नजन चिफ ब्युरो/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) शेतकऱ्यांच्या शेतातील जळालेली डीपी बदलून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‌चक्क १५०० रुपयाची लाच खाताना विज खात्याचे दोन अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या बाबतची माहिती अशी की १) सुनिल मारुती शेळके (वय ४५) पद- प्रधानतंत्रज्ञ,बेलवंडी विभाग ,ता.श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, राहणार थोरात वस्ती,वाडेगव्हाण,ता. पारनेर जिल्हा अहमदनगर,२) वैभव लहु वाळके (वय२२),पद-बाह्यश्रोत तंत्रज्ञ, बेलवंडी विभाग अंतर्गत लोणी गाव ता.श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, राहणार बेलवंडी ता.श्रीगोंदा या दोघांनी तक्रारदार यांच्या कडे शेतातील जळालेली डीपी बदलून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५०० रू ची लाच मागितली होती.त्यानुसार त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा लावला असता शेळके, आणि वाळके यांना पंचा समक्ष तक्रारदार यांच्या कडून १५००/रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.विज अधिकारी सुनिल शेळके, आणि वैभव वाळके यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,वाचक पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक प्रवीण लोखंडे हे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात सहायक सापळा अधिकारी म्हणून अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस अंमलदार बाबासाहेब कराड,रवी निमसे, किशोर लाड, संतोष शिंदे,सना सय्यद,चालक पो.हे.काॅं. हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही खात्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा यांच्या वतीने खाजगी ईसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अहमदनगर येथील अॅंटीकरप्शन आॅफ ब्युरो यांच्या कार्यालयातील ०२४१-२४२३६७७ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच १०६४ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.