स्नेहल रावसाहेब पाटील १५०० मिटर रनिंग व पायल तुकाराम कोळी भालाफेक स्पर्धेमध्ये विभागावर निवड

स्नेहल रावसाहेब पाटील १५०० मिटर रनिंग व पायल तुकाराम कोळी भालाफेक स्पर्धेमध्ये विभागावर निवड

पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रा, ता. पाचोरा विद्यालयाने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेतस्नेहल रावसाहेब पाटील १५०० मिटर रनिंग व पायल तुकाराम कोळी नांद्रा हिने यश संपादन केले.

१७ वर्षे शालेय वयोगटात  रनिंग स्पर्धेमध्ये स्नेहल रावसाहेब पाटील १५०० मि.व भालाफेक स्पर्धेमध्ये पायल तुकाराम कोळी यांची विभागावर निवड

या खेळाडूंची विभाग पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली असून विजयी खेळाडूचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतीशचंद्र काशीद, सहसचिव दीपक गरुड, महिला संचालिका उज्ज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, तसेच स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ आणि मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक एस. व्ही. शिंदे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडाशिक्षक एस. आर. निकम, अविनाश निकम, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.