चोपडा महाविद्यालयात ‘महाराजस्व अभियान’ व ‘मतदान जागृती अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘महाराजस्व अभियान’ व ‘मतदान जागृती अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय तसेच महसूल, वन विभाग व तहसील कार्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान’ व ‘मतदान जागृती अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा तालुक्याचे शेतकरी नेते एस.बी.(नाना) पाटील यांनी केले.यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांना जागृत राहण्याचा सल्ला दिला. तसेच ई- पीक पाहणी व सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासासंदर्भात माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये ई- पिक पाहणी व पी. एम. किसान सन्मान निधी योजना त्याचप्रमाणे मतदानाविषयी जनजागृती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मतदानाविषयी जागृती व्हावी संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर चोपडा कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी पीएम किसान सन्माननिधी ॲपबद्दल उपस्थितांना माहिती दिली व ई- पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा शेतकरी स्वतः कसा उताऱ्यावर लावू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचा चढता आलेख व प्रगती यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘आपण आपल्या पालकांना व गावातील सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी तसेच पीएम किसान सन्माननिधी योजना या ॲप्सची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना कशी पोचविता येईल व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी फॉर्म भरून या योजनेत सहभागी होण्यास आणि आपले सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी केले तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयात बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.