“आने वाला पल जाने वाला हैं”आर डि बरमन यांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न 

“आने वाला पल जाने वाला हैं”आर डि बरमन यांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

अमळनेर-( जळगाव) दिनांक- 4-1-2023.
प्रतिभासंपन्न, प्रयोगशील संगीतकार, पार्श्वगायक अभिनेता, राहुल देव बर्मन यांच्या 29व्या पुण्यतिथी आर डी बर्मन यांच्या चाहत्यांद्वारा त्यांच्या संगीतबद्ध सदाबहार गाणी गाऊन आणि
आठवणीत रमून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठी वाङ्मय मंडळाचे सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये रफी साहेब, किशोर कुमार, मुकेश यांची आणि पंचम द्वारा संगीतबद्ध सुपरहिट गाणी सादर करण्यात आली. “जिस गली मे तेरा घर ना हो बालमा”, “हमे और जीने की चाहत ना होती” ,”तुमने मुझे देखा”, “गुलाबी आखे जो तेरी देखी”, “दिवाना लेकर आया है दिल का तराना”, “ये क्या हुआ कैसे हुआ”, “रिमझिम गिरे सावन” ,”प्यार दिवाना होता है, तुम आ गये हो”, “ओ हंसिनी”, “एक अजनबी हसीना से”, @
अशी बहारदार गाणी सादर करण्यात आली. अमळनेरचे सुप्रसिद्ध गायक शरद आत्माराम सोनवणे व सेंट्रल बँक अमळनेरचे अधिकारी सुनील सोन्हिया, दया कृष्ण सनवाल यांनी आपल्या मधुर आवाजात,श्रोत्यांना चिंब भिजवून टाकले.
या प्रसंगी संगीतप्रेमी भाऊ साहेब देशमुख
,प्रवीण मुठे सौ मुठे, दिलीप सोनवणे , सौ.ज्योतिर्मयी सोनवणे,सेंट्रल बँक शाखा व्यवस्थापक श्री.रमण कवडे , मारवड शाखेचे श्री. भूषण सोनवने, तसेच सर्वश्री अशोक शर्मा, उमेश पाटील ,सुनील पाटील ,किशोर धनगर ,इत्यादी उपस्थित होते. भाऊसाहेब देशमुख यांनी आर डी बर्मन यांच्या संगीतातील विविध प्रयोग व त्यासाठी वापरलेली विविध साधने याची काही उदाहरणं दिली.” Dearest RD या मुंबईत जून 2022 मधे झालेल्या कार्यक्रमाचा थरारून टाकणारा अनुभव कथन केला. प्रवीण मुठे यांनी शरद सोनावणे त्यांच्यासोबत म्युझिक कार्यक्रमात केलेल्या कामांची आठवण केली. सोहनी यांनी सूत्रसंचालन केले तसेच त्यांच्या संगीत प्रवासाचा खडतर प्रवास आणि त्यांच्या गळ्यावर झालेला विष प्रयोग या बद्दल माहिती दिली तेव्हा सभागृह अवाक झाले. दिलीप सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यांनी उपस्थित संगीतप्रेमी आणि कलाकार यांचे आभार व्यक्त केले.