देवा गायकवाड महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या वतीने आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

देवा गायकवाड महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या वतीने आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

 

चोपडा प्रतिनिधी वाळवणे ता पारनेर जि अहमदनगर येथे भैरवनाथ यात्रा प्रसंगी लोकनेते पद्ममश्री कै बाळासाहेब विखे पाटील स्मरणार्थ यात्रेकरूना थंडगार पाणी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन देवा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र जोशी समाज समितीचे अध्यक्ष दिलीप परदेशी यांच्या हस्ते आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी एकनाथ गायकवाड यांनी आपल मनोगत व्यक्त केले.कैकाडी समाज ऐक्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष व आमचे आधारस्तंभ देवा गायकवाड समाजसेवेची जनू विडाच उचलला आहे.ते म्हणतात परिवर्तन झाल्याशिवाय समाज घडू शकत नाही एकनाथ भाऊ आपल्याला जातीसाठी माती खायचे आहे आपला समाज सुधारण्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आपल्या समाजाचे तळागाळातील लोकांना एकत्र करून तुमचे पुढील भवितव्य सुधारण्यासाठी देवा भाऊचे तन मन धन हे आपल्या समाजासाठी वाहून घेतलेले आहे. खरोखरच अनेक वर्षापासून देवा भाऊ जवळ जवळ ५० हजार किमी मोटार सायकलवर प्रवास करून मीटिंग कार्यक्रम घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत आणि ते म्हणतात आपल्या समाजातील बेरोजगार बांधवांना हाताला काम मिळायला पाहिजे आपला पारंपारीक व्यवसाय बुडाला आहे त्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उदयोग वाढीस लावल्यास प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो विशेष महिलाचा सहभाग आपल्यात जास्त आहे हाताला काम द्या हे ध्येय पुढे चालवले पाहीजे,मुले शिकली पाहीजे ती उच्च शिक्षित व्हायला पाहिजे आपण सगळे एकत्र यायला पाहिजे आणि खरा मुद्दा समाज्याचा जिव्हाळा प्रश्न म्हणजे क्षेत्रीय क्षेत्रीय बंधन उठवायला पाहिजे अश्या विषयावर भाऊची यासाठी तळमळ मी जवळून पाहतोय हे देवा भाऊ खरोखरच आपण निस्वार्थपणे कार्यकर्ता आहेत म्हणून दिनांक 7/4 /2023 रोजी वाळवण्याचा मध्ये विमुक्त भटक्या जाती जमातीचे आपली मागासवर्गीय जोशी समाज यांनी आपल्याला आवर्जून निमंत्रण देऊन आपणांस राष्ट्रीय महासचिव देवा गायकवाड अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ भारत यांना महाराष्ट्र द्वारे समाजसेवक पुरस्कार 2023 जाहीर करुन दिलीप परदेशी कार्याध्यक्ष यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात कचरु पोटे सर तसेच वाळवने सरपंच उपस्थित होते वाळवणे पारनेर जिल्हा अहमदनगर भैरवनाथ यात्रा प्रसंगी यात्रा करून मोफत थंडगार पाणी वाटप कार्यक्रम प्रसंगी देण्यात आला आपण या समाजात जन्म घेऊन करते संपत नाही संस्कार शिक्षण आदर्श या सर्वांची बाळगून समस्त समाज बांधवांना देऊन जी थोरवी आपण प्राप्त केली आहे प्रतिकूल परिस्थिती जिद्दीने आपण जे समाजकार्य केले त्याचा गौरव करणे हे समितीचे परम कर्तव्य आहे.दिलीप परदेशी अध्यक्ष महाराष्ट्र जोशी समाज समिती आपला सार्थ अभिमान वाटतो आहे भटक्या जाती जमातीसाठी प्रत्येक क्षेत्रात आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी बुलंद तोफ म्हणजे देवा भाऊ आपण खरोखरच तुम्ही समाजाची बांधिलकी जपता आम्हा शिरूरकरांना तुमचा अभिमान वाटतो आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे.त्याबद्दल शिरूरकरांच्या वतीने व सामाजिक,राजकीय,पोलीस अधिकारी यांच्या कडुन अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.