पाचोऱ्यात भुलाबाई महोत्सव २०२५
पाचोरा :
पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचा वारसा जपण्यासाठी दि.12 सप्टेंबर रोजी केशव स्मृति प्रतिष्ठान जळगाव संचलित अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीने भुलाबाई महोत्सव 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात भुलाबाईच्या गाण्यांच्या व नृत्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील विविध भागांतून, विविध शाळा मधून आलेल्या 10 संघांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. रंगतदार गाणी, जोशपूर्ण नृत्य आणि पारंपरिक पोशाख यामुळे वातावरण भारावून गेले. प्रत्येक संघाने आपल्या सादरीकरणातून भुलाबाईची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये,स्त्री भृण हत्या,स्त्री शिक्षण, पर्यावरण संवर्धन,असे अनेक विषय समजप्रबोधन पर प्रभावीपणे मांडले
स्पर्धेत लहान गटात सु.भा. पाटील या शाळेला पहिला क्रमांक,पाचोरा येथील लावण्या ग्रुपला द्वितीय क्रमांक तसेच गोराडखेडा येथील जिल्हा परिषद शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले मोठ्या गटात राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक, बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा यांना द्वितीय क्रमांक व परशुराम शिंदे आदर्श शाळा पाचोरा यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच माहेश्वरी ग्रुप पाचोरा यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले . आयत्यावेळी सगळ्या शिक्षिका भगिनींनी उत्साह दाखवत सहभाग नोंदवला त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले
जळगाव येथून सौ अंजली हांडे व सौ लक्ष्मी परांजपे व पाचोरा येथून सौ कल्याणी देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले त्यांनी प्रत्येक स्पर्धकांचे कौतुक करून, लोककला जिवंत ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला सौ मीना रमेश मोर,श्रीमती सुधा जोशी मॅडम, सौ स्वाती आठवले मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या या सांस्कृतिक सोहळ्याच्या निमित्ताने तालुका विधी समिती व वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी शिबिर घेण्यात आले या शिबिरात प्रा ऍड वैशालीताई बोरकर, सौं ललिताताई पाटील,प्रा. डॉ. सुनिताताई गुंजाळ,श्री विसपुते सर यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळप्रतिबंद कायदा 2013, महिलांचे हक्क व सुरक्षित्ता,अल्पवयीन मुलांचे संरक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले . यामुळे भुलाबाई महोत्सव हा केवळ स्पर्धांचा नव्हे, तर एक सांस्कृतिक सोहळा आणि कायदेशीर जनजागृती करणारा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात सौ सोनाली गौड यांच्या गणेश वंदनेने झाली, प्रास्ताविक सौ.राधिका हस्तक यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली पाटील यांनी व आभार प्रदर्शन सौ आरती दायमा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , श्रीमती मयुरी बिल्दीकर,सौ.ज्योती चौबे,
सौ स्वाती कुलकर्णी,गौरी भट, हेमा पाटील, मधुरा पाठक, शीला पाठक, प्रीती पापरीकर,पूजा तांबोळी, शर्वरी तांबोळी,क्षमा शर्मा, राधा शर्मा,रूपाली जोशी, पूजा तळेगावकर, स्मिता सराफ, तृप्ती नाईक,कोमल जोशी,माहेश्वरी रावल,ऋतुजा देशपांडे,स्वाती जोशी या मंडळाच्या सर्व महिलांनी अथक परिश्रम घेतले