तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांची श्रुंखला

छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त भाजपा युवामोर्चा व महिला आघाडीच्या वतीने शिवजन्मोत्सव स्पर्धा

तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोरा व भडगाव शहरांत विविध स्पर्धांची श्रुंखला

पाचोरा-
युवा नेते व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील भारतीय जनता युवा मोर्चा व महिला आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध विषयांवर आधारित भव्य शिवजन्मोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खेळ, कला, क्रीडा व सामाजिक जीवनाच्या स्मृती पुनर्जिवित करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली संस्मरणीय स्मृतींचा उजाळा व्हावा यासाठी या शिवजन्मोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिवजन्मोत्सव स्पर्धेत (१)वक्तृत्व गीत व गायन स्पर्धा, (२) चित्रकला स्पर्धा, (३)निबंध स्पर्धा, (४) रांगोळी स्पर्धा , (४)गड किल्ले बनवण्याची स्पर्धा व (५)वेशभूषा स्पर्धा- इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या ५ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच्या घरी बसूनच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी स्पर्धेतील विषयानुसार आपापले फोटो, व्हिडिओ, व्हाट्सअप वर टाकून निबंध, व चित्रे इत्यादी साहित्य परीक्षणासाठी “अटल भाजपा कार्यालय” कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, पाचोरा येथे पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी
समाधान मुळे -९६६५९४९२११,
योगेश ठाकूर- ९८२३११७९२४,
कुमार खेडकर- ७३८५०२०७०२,
शुभम पाटील.९०२८१९४४०६
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा व महिला आघाडी पाचोरा यांचे तर्फे करण्यात आले आहे.