‘ये जिंदगी न मिलेगी दोबारा’ -श्याम लोही

‘ये जिंदगी न मिलेगी दोबारा’ -श्याम लोही

पाचोरा – (दि20 जानेवारी 2023)
रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस एस एम एम महाविद्यालय, पाचोरा विद्यार्थी विकास विभाग व पाचोरा-भडगाव रोटरी क्लब आयोजित *’रस्ता सुरक्षा सप्ताह’* निमित्ताने जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) मा. श्याम लोही यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदर्भामध्ये मार्गदर्शन करताना *ए जिंदगी ना मिलेगी दोबारा* ‘जान है तो जहान है’ असे म्हणत देशातील प्रत्येक नागरिकाने रस्त्यावरून जात असताना रस्ता वाहतुकीचे नियम गाडी चालवताना व घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिरीष पाटील हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमास पा. ता. सह. शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ अमोल जाधव यांनी केले.

व्यासपीठावर RTO इन्स्पेक्टर हेमंत सोनवणे, उपप्राचार्य डॉ.जे व्ही पाटील, डॉ.अमोल जाधव, डॉ. गोरख महाजन, प्रा.डॉ जे. डी. गोपाळ प्रा. पी. आर. सोनवणे, रोटरियान निलेश कोटेचा, रो.प्रदीप पाटील, रो. राजेश मोर, रो डॉ. तेली, मा.चंद्रकांत लोढाया, प्रा. डॉ.एस. बी. तडवी, प्रा.डॉ के एस इंगळे, प्रा. वाय बी. पुरी, प्रा.स्वप्नील भोसले, प्रा.डॉ क्रांती सोनावणे, प्रा. डॉ. वैष्णवी महाजन, प्रा.उर्मिला पाटील, प्रा.अधिकराव पाटील, प्रा.नितीन पाटील, प्रा. सुवर्णा पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पाचोरा-भडगांव येथील रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

“आमचे विद्यार्थी देशसेवेसाठी सदैव तत्पर राहतील संस्था व महाविद्यालय यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहील, तसेच भारत मातेच्या सेवेसाठी य संस्थेने अनेक सुपुत्र दिले”, असे प्रतिपादन अधक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. माणिक पाटील यांनी केले, तर रो. प्रा शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रो.डॉ. जे. व्हि. पाटील, प्रा. डॉ. के. एस. इंगळे, प्रा.डॉ. माणिक पाटील, प्रा.डॉ एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, श्री गोपाळ चौधरी , श्री प्रकाश सुर्यवंशी, श्री सुरेंद्र तांबे, घनश्याम करोसिया, जयेश कुमावत यांनी विशेष परिश्रम घेतले.

सुमारे एक तासाच्या आपल्या विशेष मार्गदर्शनात आर. टी. ओ. शाम लोही यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थिनींना स्वतः हेल्मेट भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. नागणे मोटर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे अनिल नागणे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. रोटरी क्लब तर्फे उपस्थितांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व आरटीओ अधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन मुलांची गुणवत्ता, शिस्त व महाविद्यालयीन परिसराचे कौतुक केले.