पाचोऱ्यातील गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यावर सुवर्ण पदकांचा वर्षाव

पाचोऱ्यातील गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यावर सुवर्ण पदकांचा वर्षाव

SOF ( सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन) व NOF ( नॅशनल ऑलिम्पियाड फाउंडेशन) तर्फे दर वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परिक्षा घेतली जाते. या परिक्षेत जगभरातील अनेक देशातून लाखो विद्यार्थी विज्ञान , कॉम्प्युटर , इंग्लिश, समाज शास्त्र, सामान्य ज्ञान, गणित हे विषय घेऊन भाग घेत असतात.
चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये SOF या आंतर राष्ट्रीय स्पर्धात्मक परिक्षेत एकट्या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या 10 विद्यार्थ्याना त्यांनी मिळविलेल्या प्रविण्याबद्दल सुवर्ण पदक देऊन भूषाविण्यात आले.
तसेच, NOF या आंतरराष्ट्रिय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परिक्षेत जगभरातील 14 देशातील 45000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी हर्षिका दीपक पटवारी या Snr केजी च्या विद्यार्थिनीने इंग्लिश, हिंदी, सायन्स व गणित या प्रत्येक विषया मध्ये A++ ही सर्वोत्कृष्ट श्रेणी मिलाविल्यामुळे 4 सुवर्ण पदक एकत्र मिळविले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व प्रविण्यामुळे संबंधित पालकांना आमंत्रित करून
शाळेचे संस्थापक सचिव श्री प्रेम शामनानी, मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाणी, पर्यवेक्षिका सौ. डॉ. अमेना बोहरा यांनी यशस्वी विद्यार्थ्याना सुवर्णपदक व प्रमाण पत्र देऊन विद्यार्थ्यांसोबत पालकांना ही सन्मानित केले.