पाचोर्‍यात जगन्नाथ पुरी येथील मंदिराची प्रतिकृती बनवून प्राणप्रतिष्ठा स्थापना करून जनतेच्या सेवेसाठी केले खुले

पाचोर्‍यात मोर परिवारातर्फे जगन्नाथ पुरी येथील मंदिराची प्रतिकृती बनवून प्राणप्रतिष्ठा स्थापना करून जनतेच्या सेवेसाठी केले खुले

पाचोरा प्रतिनिधी:-अनिल (आबा) येवले.

पाचोऱ्यात अवतरली जगन्नाथ पुरी (प्राणप्रतिष्ठा, महाअभिषेक, यज्ञ, कलश पूजन व प्रवचन कार्यक्रम)
पाचोरा ता 22 = येथील इस्कॉन शाखेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धार्मिक सोहळ्यात श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मूर्ती प्राणप्रतिष्ठा, शोभायात्रा, कीर्तन, सुदर्शन नरसिंग यज्ञ, महाअभिषेक, शृंगार दर्शन, 108 भोग, महाआरती, प्रवचन व महाप्रसाद असा विविधांगी सोहळा हरे कृष्ण हरे रामचा जयघोष करत साजरा करण्यात आल्याने पाचोर्‍यात अक्षरशः जगन्नाथ पुरी अवतरल्याची अनुभूती झाली .यामुळे धार्मिकतेला उधाण आले.
वरखेडी रोडवरील आर्वे शिवारात रमेश मोर या दानशुरांच्या योगदानातून साकारलेल्या अत्यंत टुमदार व देखण्या इस्कॉनच्या श्री जगन्नाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न झाला. यानिमित्ताने ता 21 व 22 मार्च रोजी दोन दिवशीय धार्मिक सोहळा पार पडला. ता 21 रोजी सकाळी या सोहळ्यानिमित्ताने इस्कॉन सदस्य व युवकांची बाईक रॅली जयराम कॉलनीपासून ते इस्कॉन मंदिरापर्यंत काढण्यात आली. तसेच इस्कॉन तर्फे शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान भगवान श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा अधिवास व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. ता 22 रोजी सकाळी प.पू. लोकनाथ स्वामी महाराज यांच्या आगमना निमित्ताने शोभायात्रा काढण्यात येऊन जगन्नाथ मंदिरात यात्रेचा समारोप करण्यात आला. सकाळी 8 ते 9 दरम्यान सुदर्शन नरसिंग यज्ञ ,जगन्नाथ मंदिरावरील कलश पूजन व कलशारोहण कार्यक्रम झाला. कृष्ण कृपामूर्ती भक्ती वेदांत स्वामी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढून व्यासपीठावर स्थापना करण्यात आली. श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मुर्तीचा महाअभिषेक करून मंदिरात त्यांची विधिवत स्थापना करण्यात आली.
मंदिराच्या प्रांगणात श्रीमती विद्यावती मोर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. मूर्ती स्थापने नंतर शृंगार दर्शन व 108 भोग कार्यक्रम झाला. प.पू. लोकनाथ स्वामी महाराज यांच्या अमृतवाणीतून सत्संगाचे निरूपण झाले. त्यानंतर महआरती होऊन महाप्रसादाने सांगता झाली.
या कार्यक्रमास आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल ,पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, रमेश मोर,सुरेश मोर, सुनील मोर, अजय थेपडे, भरत सिनकर,अपूर्व थेपडे, मोहन अग्रवाल, मुन्ना अग्रवाल, प्रल्हाद महाराज (पंढरपूर), वारकरी शिक्षण संस्थेचे हभप योगेश महाराज, अशोक महाजन, योगेश पाटील, ऍड नरेंद्रसिंग सूर्यवंशी, सुनील पाटील, अनंत शेषदास महाराज ,अमृतदास नानकर, चैतन्य जीवन प्रभू, जगन्नाथयात्रा दास, प्रभू कृष्णप्रसाद , प्रवाह प्रभू,डॉ प्रवीण गवळी,प्रा सी एन चौधरी,महेश कौंडिण्य सर शांताराम चौधरी सर, निखिल मोर, नंदू शेलकर, किशोर राय साकडा,योगेश पाटील सर, कैलास अहिरे, मनोज चौबे , सुजित तिवारी, कृष्णा व्यास, अनिल येवले आदि उपस्थित होते. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, रमेश मोर, सुरेश मोर ,वैशाली सूर्यवंशी, दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. पंढरपूर येथे साकारणाऱ्या वैकुंठधामसाठी सुरेश मोरे यांनी एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर केली. जागेसह श्री जगन्नाथ मंदिर उभारून देणाऱ्या दानशूर रमेश मोर यांचा इस्कॉन व अग्रवाल समाज मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंदिराच्या प्रांगणात गोविंदा प्रसादालयाचे भूमिपूजनही करण्यात आले.
या इस्कॉन मंदिरात बालकांसाठी बगीचा व खेळणी,बालसंस्कार केंद्र, गोशाळा, गीता भागवत ज्ञान प्रसार केंद्र, समाज प्रबोधन केंद्र, कृष्णप्रसाद अन्नदान केंद्र आदी सेवा देण्यात येणार असल्याचे इस्कॉनच्या वतीने जाहीर करण्यात आले. प.पू. लोकनाथ स्वामी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून धार्मिक, सामाजिक एकता व अखंडतेचा संदेश दिला. श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा शृंगार , महाअभिषेक व 108 भोग नंतर भाविकांनी दर्शन घेतले. या दोन दिवशीय कार्यक्रमात हरे कृष्ण हरे रामचा जय घोष करण्यात आल्याने सारा परिसर दुमदुमला कार्यक्रम. या सोहळ्यास देशभरातील इस्कॉनचे पदाधिकारी, अधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवशीय धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी इस्कॉन व मोर परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. अनंत शेषदास महाराजांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले. डॉ प्रवीण गवळी यांनी आभार मानले.