समाजसेवक सुमित पंडित यांना ज्ञानवंत समाजसेवक पुरस्कार जाहीर

समाजसेवक सुमित पंडित यांना ज्ञानवंत समाजसेवक पुरस्कार जाहीर
…………………………………………………………….
समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरंच समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढीकटींग करुन स्वच्छ अंघोळ घालून त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्ध्यारात्री वैद्यकिय साहित्य,भोजन, तसेच रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदूता सारखी मदतीला धावून जाते , बेवारसांचे अंत्यविधी सुध्दा हे दापत्य सु-लक्षी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात,सुमित यांच्या पत्नी पुजा पंडीत ह्या सध्या जटवाडा रोडलगत माणुसकी वृध्दाश्रम चालवतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, उभतांना सन्मानित करण्यात येणार आहे. समाजसेवक सुमित पंडित यांना या यापूर्वी विविध क्षेत्रातील ९१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
मुक्ताई महिला बहुद्देशिय संस्था व जनमत प्रतिष्ठाण तर्फे करियर महोत्सव २०२२ निमित्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा जळगाव येथे दिनांक.२६-१२-२०२२ रोजी आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजक.
अध्यक्ष,पंकज नाले,यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे जनमत प्रतिष्ठाण फाँडेशन निवड समितीतर्फे कळवीले आहे.ह्या पुरस्काराने समाजात सुमित पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.