सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज शालेय क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात

सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज शालेय क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज शालेय क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनासाठी एम.एम. कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक श्री.गिरीश पाटील सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर उपस्थित होते.झेंडा दाखवून विद्यार्थ्यांच्या धावणे या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.क्रीडा सप्ताहात धावणे, सॅक रेस,तीन पायाची शर्यत,कबड्डी,बुक बॅलन्स, लांब उडी,संगीत खुर्ची अशा विविध मैदानी सांघिक व वैयक्तिक तसेच हस्ताक्षर व वकृत्व अशा बौद्धिक स्पर्धांची रेलचेल असणार आहे. विद्यार्थ्यांना श्रीमती सारिका पाटील मॅडम व प्रमुख पाहुण्यांनी खेळ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.चारुशीला पाटील मॅडम यांनी तर आभार श्री. राहुल वाघ सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.