पाचोरा शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा

पाचोरा शहर येथे ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा

पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहर येथे ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आली. या दिवशी इस्लाम धर्मचे पैगमबर हजरत मोहम्मद यांच्या जनम दिवस आहे, हया कारणाने त्यांचे अनुयायी या दिवसाला ईद मीलाद महणून साजरा करतात. आपल्या घर व गली महोलला सजवतात. पाचोरा शहर मध्य हि त्यांचे अनुयायी यांनी जुलूस (मिरवणूक) काढून ईद-ए-मिलाद साजरा केला. गावातील सर्व मुस्लिम समाजातील लोक नूर मस्जिद आठवडे बाजार येथे एकत्रित झाले व येथून जुलूस (मिरवणूक) ची सुरुवात झाली. हुसैनी चौक, देशमुख वाडी, शिवाजी चौक, मुल्ला बाळा येथे घुमुन शेवटी जुलूस नूर मस्जिद कडे आला. या वेळी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील, सचिन सोमवंशी, मुकुंद बिलदिकर, संजय गोईल,लोकांना ईद मिलाद ची शुभेच्छा देण्यासाठी नूर मस्जिद येथून पोहोचले.आमदार साहेबांचा हस्ते सर्व उलेमा (मौलवी साहेब) यांच्या फुल व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मौलाना जिशान रजा यांनी पैगंबर मोहम्मद यांचे जीवनीवर प्रकाश टाकले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीचे पाचोरा आणि भडगाव वासना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मुस्लिम बांधवांचा आभार व्यक्त केले