महिलांनी एखादे ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलले तर काहीही अशक्य नाही – सूनिताताई पाटील

महिलांनी एखादे ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलले तर काहीही अशक्य नाही – सूनिताताई पाटील

नगरदेवळा प्रतिनिधि

आमदार किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय सामजिक संस्था पाचोरा तर्फे नगरदेवळा जिल्हा परिषद मराठी शाळा येथे अगरबत्ती व्यवसाय, प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले त्याठिकाणी प्रमूख पाहुणे म्हणून मा. नगराध्यक्षा सूनीताताई पाटील, नाशिक येथील कैलास मोरे, राजेन्द्र कुलकर्णी, अंजलिताई चौहान यांनी उपस्थीत राहून महिलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात करन्यात आली. आज महिला प्रत्येक शेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतांना दिसून येत आहेत. त्यातच संसाराच्या प्रपंचातून वेळ काढून व्यवसाय करून त्यांनी देखील आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हायला पाहिजे कारण महागाईचा भस्मासुर पाहता प्रत्येक महिलेने व्यावसायिक व्हायला पाहिजे असा आमदार किशोर आप्पा पाटील बहुउद्देशिय संस्थेचा दृष्टिकोन असून महिलांनी एखादे ध्येय गाठण्यासाठी पाऊल उचलले तर काहिही करू शकतात असे प्रतिपादन सुनिताताई यांनी शिबिरांत केले. तसेच राजेन्द्र कुलकर्णी, कैलास मोरे, अंजलीताई चौहान यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना आपल्याकडील कौशल्याचा प्रामाणिक उपयोग करणे, मिळालेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणे, कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी लौकिक शिक्षण आड येत नाहि. उद्योजकीय ज्ञान मात्र आवश्यक असते महिलांनी स्वतच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे असे सांगत अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण शिबिरात नगरदेवळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.