पाचोऱ्यात महापुरुष सन्मान समितीच्या माध्यमातून महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन

पाचोऱ्यात महापुरुष सन्मान समितीच्या माध्यमातून महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन
– हुतात्मा स्मारकात महत्वपूर्ण बैठक संपन्न….

पाचोरा  प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने शहरातील हुतात्मा स्मारकात दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महापुरुष सन्मान समितीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आर. पी. बागुल तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल शिंदे, खलिल देशमुख, आनंद नवगिरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संजय महाले, के. एस. महाजन हे व्यासपीठ होते.
या बैठकीत महापुरुष सन्मान समितीच्या वतीने येत्या ११ एप्रिल ते १४ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त जयंतीसाठी शहरातील सर्व पुरोगामी व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना महापुरूषाच्या जयंती निमित्ताने वैचारिक व प्रबोधनाचे भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. बैठकीची सुरुवात मा. काशिराम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जयंती साजरी करण्यात आली. या बैठकीस प्रविण ब्राम्हणे, अशोक मोरे, दिपक आदिवाल, जय वाघ, भिमराव खैरे, अनिल लोंढे,भालचंद्र ब्राम्हणे,विलास पाटील सर अशोक महाजन, एम. एस. महाजन, रविंद्र खैरे, राजरत्न पानपाटील, संतोष कदम, रविंद्र चौधरी, मयुर महाजन, चिंधु मोकळ, संतोष महाजन, सुदर्शन महाजन, सुरेश कदम, संदिप जगताप सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या प्रास्ताविकात महापुरुष सन्मान समितीचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक किशोर डोंगरे यांनी महापुरुषांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमा संदर्भात उपस्थितांना माहिती दिली.