जागतिक एच आय व्ही एड्स दिनानिमित्त भडगाव येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था संचलित व अभिनव डीएमएलटी कॉलेज तर्फे जनजागृती अभियान उत्साहात

 जागतिक एच आय व्ही एड्स दिनानिमित्त भडगाव येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था संचलित व अभिनव डीएमएलटी कॉलेज तर्फे जनजागृती अभियान उत्साहात

पाचोरा भडगाव प्रतिनिधी { अनिल आबा येवले } भडगाव येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था संचलित अभिनव डी एम एल टी कॉलेज तर्फे गेल्या सात वर्षापासून अनेक विविध कार्यक्रम घेतले जात असून जनजागृती यावर त्यांचा अधिक भर देऊन नागरिकांना उत्साहित व प्रेरणा देऊन जनजागृती अभियान राबवून नागरिकांना जनजागृती करून नवी दिशा नवीन आशा देऊन प्रेरित करीत असे या संस्थेमार्फत यावर्षीही गेल्या सात वर्षांपासून शहरात प्रचार रॅली काढून एक डिसेंबर या जागतिक एच आय व्ही एडस दिनानिमित्त विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची रॅली संपूर्ण भडगाव शहरात काढून तसेच पोस्टर प्रदर्शन व पथनाट्य सादरीकरण करून जागृती करीत असे या कार्यक्रमाची नियोजन भडगाव पोलीस स्टेशन तहसील कार्यालय व भडगाव बस स्टँड जवळ जनजागृती चे कार्यक्रम घेऊन नागरिकांना प्रबोधन करीत असे या कार्यक्रमाच्या वेळी भडगाव चे तहसीलदार श्री मुकेश हिवाळे साहेब भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील साहेब तसेच ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर श्री पंकज जाधव अभिनव संस्थेचे संचालक श्री दिलीप पाटील अभिनव कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी शिपाई व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहत असे