राज्यस्तरीय कला भूषण पुरस्काराने विश्वासराव पाटील वाघ यांचा गौरव

राज्यस्तरीय कला भूषण पुरस्काराने विश्वासराव पाटील वाघ यांचा गौरव

 

दिनांक : 10 ऑक्टोबर 2025

वरुड बुद्रुक (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी) भोकरदन, जि. जालना) येथील विश्वासराव संपतराव पाटील वाघ यांना सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल “कला भूषण” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

हा पुरस्कार संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती, भोकरदन-जाफराबाद तसेच महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येतो. समाजात बंधुभाव निर्माण करणाऱ्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो.

 

पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शासकीय विश्रामगृह, जालना येथे पार पडला. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

या सन्मानानंतर बोरशे गुरुजी, पाबळे पा., भगवान पालकर व मित्रमंडळींनी विश्वासराव पाटील वाघ यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सन्मानपत्रावर उपाध्यक्ष मदनराव कुलकर्णी आणि अध्यक्ष महादू सुरडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.