पाचोरा – येथे पाचोरा तालुका युवा सेना तर्फे पतंग महोत्सव बाळगोपाळांसह मोठ्या उत्साहात साजरा

पाचोरा – येथे पाचोरा तालुका युवा सेना तर्फे पतंग महोत्सव बाळगोपाळांसह मोठ्या उत्साहात साजरा

पाचोरा – येथे पाचोरा तालुका युवा सेना तर्फे पतंग महोत्सव बाळगोपाळांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी पतंग उडवताना बाळगोपाळांमध्ये रमलेल्या बघायला मिळाल्या.

सुरवातीला सर्व बाळ गोपाळांना वैशाली ताई यांच्या हस्ते तिळगुळ, पतंग मांजा चे वाटप करण्यात आले. यावेळी युवा सेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे जयश्री येवले अनिता पाटील जगदीश महाजन फकिरचंद पाटील मयूर मिस्तरी प्रशांत सोनार संतोष पाटील नंदू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी वैशालीताई यांनी पाचोरा पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व जनतेला संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सर्व उपस्थित बाळगोपाळांना पतंग जशी वर आकाशात उंच भरारी घेऊन उडते तसेच तुम्हीही खूप अभ्यास करून उंच भरारी घ्यावी तसेच गच्चीवर पतंग उडवताना काळजी घेण्याचेही आवाहन वैशालीताई यांनी केले.