दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ :आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याचा राज्यभरातील आमदारांसह दिव्यांगांना मिळणार लाभ

दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ :आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याचा राज्यभरातील आमदारांसह दिव्यांगांना मिळणार लाभ

पाचोरा (वार्ताहर) दि,२८
आ.किशोर अप्पा पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुरावा यश आले असून आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या कमाल खर्च मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय अखेर शासनाने घेतला असून आता वार्षिक केवळ दहा लाख रुपयांऐवजी तीस लाख रुपये खर्च मर्यादा करण्यात आली असून नुकताच याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांना आता आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध होणे सुलभ होणार आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघात आ. किशोर अप्पा पाटील यांचे वतीने दिव्यांग बांधवांना आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या तज्ज्ञांमार्फत पाचोरा व भडगाव येथे स्वतंत्रपणे दिव्यांग बांधवाच्या नोंदणीसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल, व्हील चेअर,कृत्रिम अंग व उपकरणे आदी साहित्य उपलब्धता होणार आहे.मात्र यात नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींची संख्या व आवश्यक सहाय्यक साहित्यांची संख्या विचारात घेता ते शासनाने निर्धारित केलेल्या दहा लाख रुपये खर्च मर्यादेत बसणे शक्य नसल्याने यात वाढ करून सदर रक्कम किमाम तीस लाख रुपये करण्याची आग्रही मागणी आ.किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती. दरम्यान शासनाने त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन याबाबचा शासन निर्णय जाहीर करून खर्च मर्यादा दहा लाखावरून तीस लाख रुपये केली आहे
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे केवळ राज्यभरातील आमदार महोदयांनाच नव्हे तर राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांना देखील या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान आ.किशोर अप्पा पाटील यांनी या निर्णया बद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.

पाचोरा तालुक्यातील दिव्यांगांना मिळणार लवकरच सहाय्यक साहित्यआ

.किशोर अप्पा पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या आवश्यक सहाय्यक साहित्य तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सुमारे १० लक्ष रुपयांच्या साहित्याचे यापूर्वीच वाटप झाले असून आता लवकरच पाचोरा तालुक्यातील तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती आमदार किशोर अप्पा पाटील यांचे वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी दिली आहे.