पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द प्र.प्रा. येथे प.पु. गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द प्र.प्रा. येथे प.पु. गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

श्री स्वामी समर्थ गुरु पिठाचे पिठाधीश प.पु.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम, व शालेय साहित्य वाटप यामध्ये पाचोरा परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी अकराशे वही पेन वाटपाचा संकल्प हाती घेऊन जवळपास दहा अकरा जि. प. शाळांना साहित्य वाटप करण्यात आले .दि १-४-२०२३ शनिवारी पिंप्री खुर्द येथे या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यामध्ये गोविंद भाऊ शेलार, पाचोरा केंद्र प्रतिनिधी गोकुळ पाटील, संजयभाऊ, कडे वडगाव येथील संदीप पाटील, अतुल पाटील, गोपाल पाटील, गजानन पाटील, ज्ञानेश्वर कदम, पत्रकार विनोद, गावातील सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन तसेच सचिव आणि सर्व सदस्य सोसायटी, तंटामुक्ती समिती, समस्त सेवेकरी,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंप्री , मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते……… अमोल भाऊंनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व सेवेकरी वर्गाचे या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.
अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला🙏🌹