पथराड येथील श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय पथराड ता. भडगाव येथे दांडिया संध्याकाळ उत्साहात साजरी

पथराड येथील श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय पथराड ता. भडगाव येथे दांडिया संध्याकाळ उत्साहात साजरी

 

 

माध्यमिक विद्यालय पथराड येथे संस्थेच्या संचालिका माननीय सुवर्णाताई भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने पथराड गावातील व पंचक्रोशीतील सर्व महिलांसाठी गरबा संध्याकाळ चे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर व सन्मान व्हावा या उदात्तेतूने हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महिला, प्रश्नमंजुषा, उखाणे असे अनेक कार्यक्रमावर आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

सुरवातीस संस्थेच्या संचालिका माननीय सुवर्णाताई भैय्यासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी खूपच मोठ्या संख्येने महिला व मुली या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील हा आगळावेगळा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माननीय भैय्यासाहेब पाटील यांच्यावतीने आयोजित केल्याने सर्व महिलांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सत्कार ला उत्तर देताना ताईसाहेब सुवर्णा पाटील यांनी सांगितले की ग्रामीण भागातील महिलांमध्ये अनेक चांगले गुण असतात त्या गुणांना कुठेतरी वाव मिळावी व नवरात्रीमध्ये मूर्तिपूजनाबरोबर स्त्रीच्या देखील सन्मान व्हावा. स्त्रियांनी स्वावलंबी बनावे असे आपल्या मनोगतुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सारिका महाजन मॅडम व आभार प्रदर्शन श्री समाधान पाटील सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.