राष्ट्रीय खो – खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी दिलीप चौधरी यांची पंच म्हणून निवड

राष्ट्रीय खो – खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी दिलीप चौधरी यांची पंच म्हणून निवड….!!!!!

जळगाव – भारतीय खो – खो महासंघाच्या मान्यतेने छत्तीसगड येथे होणाऱ्या 42 व्या कुमार / मुली गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2023-24 आयोजित करण्यात आली आहे,या स्पर्धेसाठी गुरुकूल इंटरनशनल ( पाचोरा ) येथील क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय खो – खो पंच श्री दिलीप कैलास चौधरी यांची खो – खो पंच म्हणून भारतीय खो – खो महासंघाने नियुक्ती केली आहे, त्यांच्या या नियुक्ती बदल महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष संजिवराजे निंबाळकर , महासंघाचे सहसचिव डॉ . प्रा . चंद्रजित जाधव राज्य सचिव गोविंद शर्मा , जिल्हा संघटनेचे पदाधिकारी माजी आ.प्रा . चंद्रकांत सोनवणे , प्रा.डी.डी बच्छाव , उदय पाटील , गणपत पोळ , गुरुदत्त चव्हाण , डॉ.प्रा श्रीकृष्ण बेलोरकर , जयांशू पोळ , सुनिल समदाणी , एन . डी . सोनवणे , सौ . विद्या कलंत्री , राहुल पोळ , अनंता समदाणी, चंद्रकांत महाजन दत्ता महाजन , प्रेमचंद चौधरी,विशाल पाटील यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.