रविंद्र पाटील यांना द बेस्ट कोचिंग टिचर्स ॲवार्ड -२०२२ प्रदान

रविंद्र पाटील यांना द बेस्ट कोचिंग टिचर्स ॲवार्ड -२०२२ प्रदान

नाशिक : शिक्षक दिनानिमित्त ज्ञानगंगेचे प्रतिबिंब विद्यार्थी मनावर सखोल रुजवून पवित्र ज्ञानदानाचे कर्तव्य अविरतपणे पार पाडणारे आर सी ई एज्युकेशन नाशिक चे शिक्षक रविंद्र पाटील यांना खाजगी कोचिंग क्लासेस संघटना नाशिक यांचे वतीने सपकाळ नाॅलेज हब चे संचालक रविंद्र सपकाळ यांचे हस्ते द बेस्ट कोचिंग टिचर्स ॲवार्ड-२०२२ प्रदान करण्यात आला, कालिदास कलामंदिर येथे पार पडलेल्या या दैद्विप्यमान सोहळ्यास नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, संदीप युनिव्हर्सिटी चे संदिप झा, नवनीत एज्युकेशन चे संजीव गाला, महाराष्ट्र राज्य पी. टी. ए. चे अध्यक्ष विजय पवार, नाशिक क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, संघटनेचे पदाधिकारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते