तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. १ – शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेतील विविध व्यवसायांकरीता/विषयाकरीता रिक्त असलेल्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्ती करावयाची आहे.
पद, व्यवसाय/ विषय, भरावयाची पदसंख्या :- शिल्प निदेशक- (प्रत्येकी एक पद)- मेकॅनिक ट्रॅक्टर, फाउंड्रीमॅन, मेकॅनिक डिझेल, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग, इन्स्टूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक.
पद, व्यवसाय/ विषय, भरावयाची पदसंख्या :- विषय शिक्षक- (प्रत्येकी एक पद)- एम्प्लॉएबिलिटी स्कील्स.
शिल्प निदेशक पदाकरिता शैक्षणिक पात्रता :- संबंधीत विषयातील अभियांत्रिकी शाखेची पदविका/पदवी किंवा संबंधीत व्यवसायात आय.टी.आय.उत्तीर्ण आवश्यक.
एम्प्लॉएबिलिटी स्कील करीता शैक्षणिक पात्रता :- एमबीए/बीबीए किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर/कुठल्याही शाखेची पदवीका व संबंधीत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव तसेच इंग्रजी व संपर्क कौशल्य तसेच संगणक विषयीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
तरी इच्छूक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या सांक्षंकित केलेल्या प्रतीसह 9 मार्च, 2023 रोजी सकाळी ठिक 10.00 वा. मुलाखतीकरीता उपरोक्त पत्त्यावर वेळेत हजर रहावे. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.