महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भडगावात रक्तदान शिबीर संपन्न

महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भडगावात रक्तदान शिबीर संपन्न….!!!!!

भडगाव (प्रतिनिधी)- डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या सौजन्याने तसेच पद्मश्री डॉ.ति.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी तथा ति.श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातुन,महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भडगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.
जळगाव येथील शासकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच श्रीसदस्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येऊन यात एकूण १४८ श्रीसदस्यांनी आपले रक्तदान केले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.साहेबराव अहिरे,डॉ.दिपक पाटील,डॉ.मनोज पाटील,डॉ.शहानवाज खान,परिचारिका रोहिणी देवकर,परिचारक निलेश पवार,वॉर्डबॉय संदीप सुरवाडे,केशव साळुंखे आदिंचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी भडगाव परिसरातील श्रीसदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.