नांद्रा येथील आसनखेडा रोड लगत वस्तीचे नामकरण छत्रपती शिवाजी नगर असे संपन्न झाले

नांद्रा येथील आसनखेडा रोड लगत वस्तीचे नामकरण छत्रपती शिवाजी नगर असे संपन्न झाले

नाँद्रा ता.पाचोरा (वार्ताहार)- येथे नांद्रा आसनखेडा रोड लगत असलेल्या इंदिरा आवास योजनाच्या घरकुल वस्ती व इतर वस्तीचे नामकरण शिवाजी नगर असे करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन व फलक अनावरण सोहळा सरपंच आशाताई भिकन पाटिल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .याठिकाणी मोठा प्रमाणात लोकवस्ती झाली असून मुलांचे शैक्षणिक कागदपञे,पॕनकार्ड ,आधारकार्ड,इतर शासकीय दस्तावेज कागदपञे,आॕनलाईन स्पर्धा परीक्षा ,आॕनलाईन शाॕपिंग यासाठी गुगल मॕप वरून ठोस रहिवासी पुरावा ग्राह्य धरण्यात येतो त्यासाठी सर्वे नंबर ,प्लाॕट नंबर हे महत्त्वाचे असते म्हणून पोस्ट आॕफिस व आॕनलाईन मॕपिंग व्दारे ठोस शिवाजी नगरचे नाव दिल्या गेल्यामुळे आता कागदोपञी देवाण घेवाण व्यवहार सुध्दा सुरळीत होईल व येणारे आॕनलाईन पार्सल सुध्दा व्यवस्थित घरपोच होईल.याच बरोबर आता मूलभूत सोई सुविधा सुध्दा या नगर मध्ये होणे गरजेचे आहे त्यामध्ये ,रस्ते ,नाली,महिला व पुरुष शौचालय युनिट होणे गरजेचे आहे.या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.प.कमिटीचे सरपंच आशाताई भिकन पाटिल ,विनोद तावडे,उपसरपँच शिवाजी तावडे,ग्रा.प.सदस्य किशोर खैरनार,बंटी सूर्यवंशी,आनंदा बाविस्कर,योगेश सूर्यवंशी,ग्रा.प.सदस्या निर्मला पिंपळे,पञकार प्रा.यशवंत पवार,बापुसर सूर्यवंशी,विनोदआप्पा बाविस्कर,योगेश तावडे,माजी उपसरपंच साहेबराव साळवे,संजय बाविस्कर,निलेश बाविस्कर,भूषण तावडे,रामदास तुकाराम,सोपान पवार,पोलिस पाटील किरण तावडे,नाना पंडित,गजानन बाविस्कर,ईश्वर पोपट हे उपस्थित होते.यानगरचे अध्यक्ष म्हणून नाना पंडित सूर्यवँशी व सचिव म्हणून प्रकाश सुकदेव पटाईत यांची सर्वानूमते निवड करण्यात आली आहे व लवकरच कार्यकारणी कमिटी ही जाहिर करण्यात येणार आहे