सावखेडा खु येथे कामधेनु दत्तक ग्राम योजनें अंतर्गत शिबिर संपन्न…

*सावखेडा खु” येथे कामधेनु दत्तक ग्राम योजनेअंतर्गत शिबिर संपन्न*

 

 

*पाचोरा, प्रतिनिधी* !
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – १ वरखेडी कार्यक्षेत्रातील सावखेडा खु” ता. पाचोरा येथे कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन व वंध्यत्व तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी पिंपळगाव – शिंदाड गटाचे जि. प. सदस्य मधुकर काटे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कर्तारसिंग परदेशी यांनी दिपप्रज्वलन करून केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जळगांवचे माजी सहाय्यक आयुक्त डॉ. एन. आर. पाटील यांनी कामधेनू दत्तक ग्राम योजने बाबत सविस्तर माहिती दिली. शिबिरात आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी सांगितले की, शेतीस पूरक व्यवसाय पशुपालन असल्याने तरुणांनी पशुपालना कडे वळावे. पशुपालन केल्याने आर्थिक उन्नतीस मदत होते. यावेळी कर्तारसिंग परदेशी यांनी ते स्वतः पशुपालन करत असल्याने निश्‍चितच चांगली मदत होते व पशुपालन बाबत आपले अनुभव सांगितले. यावेळी युवराज पाटील, जयसिंग परदेशी (कारभारी), स्वरूपचंद बालचंद परदेशी, माजी उपसरपंच डॉ. प्रविण परदेशी, पोलिस पाटील देवीलाल परदेशी, शरद पाटील, जयंत पाटील, मस्तान तडवी, अनिल परदेशी, गणेश परदेशी, अमृत जाधव, रंजीत तडवी, माजी उपसरपंच ईश्वर नावी, सोसायटी सदस्य गणेश परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य महारु पाटील, संजय धोंडू परदेशी, बन्सी परदेशी, शिवाजी परदेशी व ग्रामस्थ व पालक कार्यक्रमास उपस्थित होते.
शिबिरात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. अशोक आर. महाजन, डॉ. अमित पाटील (पिंपळगाव, हरेश्वर), डॉ. गवळी (लोहारा) डॉ. निलेश बारी (नांद्रा), डॉ. गौतम वानखडे, डॉ. मडावी, डॉ. संदीप पाटील, डॉ. रवि पाटील (लोहारी), डॉ. सचिन पाटील (पाचोरा), डॉ. प्रविण परदेशी (सावखेडा), चेतन पाटील, बाळू पाटील, मोहन परदेशी, प्रवीण महाले, संजय पाटील (पाचोरा) यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील (लोहटार) यांनी तर उपस्थितांचे आभार पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन यांनी मानली.