उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक स्तनपान सप्ताहाचा तिसरा दिवस साजरा

उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक स्तनपान सप्ताहाचा तिसरा दिवस साजरा

 

आज दिनांक ३/०८/२३रोजी गुरुवार ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक स्तनपान सप्ताहाचा तिसरा दिवस साजरा करण्यात आला. आज आरोग्य शिक्षण स्पर्धा घेण्यात आली होती.
या कार्यक्रमामध्ये मा. डॉ. खुजे सर ( वैधकिय अधीक्षक) मा. वंदना बरडे मॅडम( स. अधिसेविका ) , श्रीमती संगीता नकले ( परीसेविका) श्रीमती सुनंदा पुसणाके ( परीसेविका) श्रीमती कापटे ( परिसेविका) आणि इतर अधिपरीचरिका , गीतांजली ढोक ( आहारतज्ज्ञ) वंदना बुरेवार तसेच इंनरव्हील क्लब च्या अध्यक्ष वैशाली चाहरे, प्रतिभा मणियार,संध्या बाऱई,पुनम जयस्वाल, पूजा गोठी, कविता बाहेती सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सौ वंदना बरडे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले. मा. डॉ खुजे सर यांनी स्तनपान बद्दल मार्गदर्शन केले. नंतर आरोग्य शिक्षण स्पर्धा घेण्यात आली यामध्ये staff नी वेगवेगळ्या टॉपिक वरती आरोग्य शिक्षण दिले. आणि शेवटी इंनरव्हील क्लब कडून महिलांना फळवाटप करण्यात आले .
खालील स्टाफ यानी topics वरती आरोग्य शिक्षण दिले.
१ ) सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी स्तनपानात कुटूंबाचा सहभाग आणि या वर्षाच्या थीमप्रमाणे स्तनपानाचे सक्षमीकरण नोकरदार पालकांसाठी एक बदल या विषयावर मार्गदर्शन केले
२) प्रियांका दांडेकर ( स्तनपान च्या स्थिती)
३) अश्विनी बगळे( स्तनपानाची सनद)
४) सोनल घाग( संपूर्ण लसीकरण)
५)पायल खांद्रे ( स्तनपानात कुटुंबाचा सहभाग)
६) प्रणाली गाठे(१ ते २ वर्षा पर्यंत बाळाचा आहार)
७) प्रियांका सोनुले( बाळाचे सर्वसाधारण काळजी)
८) वर्षा मॅडम फिजिओथेरपिस्ट
स्तनपान बद्दल संपूर्ण माहिती
९) डॉ.गेडाम (स्त्रीरोगतजज्ञ) स्तनपानाचे फायदे.