पाचोरा युवा सेने तर्फे देण्यात आले होते निवेदन दखल घेतली असती तर युवकांचे प्राण वाचले असते

पाचोरा युवा सेने तर्फे देण्यात आले होते निवेदनची दखल घेतली असती तर युवकांचे प्राण वाचले असते

 

पाचोरा युवा सेने तर्फे निवेदन देण्यात आले होते गतिरोधक तसेच दिशा दर्शक फलक लावण्या संदर्भात निवेदन पण निवेदनाची दखल घेतली असती तर आज राजेश शेलार प्राण वाचले असते अशी माहिती युवा सेना उपजिल्हा प्रमुख संदीप जैन यांनी दिली

अंतुर्ली फाटा ते गोराडखेडा गांव महामार्ग रस्त्यावर गतिरोधक तसेच दिशा दर्शक फलक लावण्या संदर्भात.

वरील विषया अनुसरुन आम्ही आपणांस लक्षात आणून देऊ इच्छितो की पाचोरा शहर भागात अंतुर्ली फाटा ते गोराडखेडा गांव महामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असुन हि मालीका अजुनही सुरुच आहे. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहे त्यात अनेकांचे प्राणही गेले आहे. यात अनेकांना कायमचे अपंगत्व येऊन त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या महामार्गावर गतीरोधक बसविणे, दिशा दर्शक फलक लावणे, वेग मर्यादा ठरविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरी या बार्बीची आपण त्वरीत दखल घेवून अंबलबजावणी करण्याचे आदेश संबंधीत विभागाला द्यावे अन्यथा पाचोरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना तर्फे सनदशील मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.