गो.पु.पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच परिक्षेसंदर्भात समुपदेशन संपन्न

_गो.पु.पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच परिक्षेसंदर्भात समुपदेशन संपन्न….!!!!_

*कोळगाव (भडगाव) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव,येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुनिल पाटील स्थानिक शाळा समितीचे युवराज पाटील,संभाजी देसले,प्रवीण पाटील,माजी सरपंच अनिल बिऱ्हाडे,बापू पैलवान,शरद पैलवान,भगवान माळी आदि उपस्थित होते,सखाराम वाघ,सुर्यकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक असे मनोगत व्यक्त केले तर योगेश बोरसे यांनी मंडळातर्फे होणाऱ्या परिक्षेसंदर्भात अतिशय महत्वाचे असे समुपदेशन केले.
सदर निरोप समारंभात विद्यार्थ्यांमधून अतिशय भावनिक वातावरणात देवयानी पाटील,रिना पाटील,रोशनी पाटील,कोमल पाटील,वैष्णवी पाटील,नंदिनी पाटील,सुवर्णा खैरणार,राहुल जैन यांनी मनोगत व्यक्त केले शुभांगी पाटील हिने निरोप समारंभाला साजेशी ऋदयस्पर्शी कविता सादर केली.
क्रीडा क्षेत्रांत विद्यालयाचे नाव यशोशिखरावर नेणाऱ्या खेळाडूंचा गौरव पदक,प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पालकांच्या तसेच आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला,या कार्यक्रमाचे सुत्र प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी सांभाळली.
संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी तथा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रशांत पाटील,सुत्रसंचालन दहावीचे वर्गशिक्षक चेतन भोसले यांनी केले तर आभार राहुल नेरपगार यांनी मानले.