सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा

सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा

पाचोरा:-पाचोरा भडगाव तालुक्यातील डेंग्यू लागण नियंत्रणात आणण्यासाठी तथा नागरिकांचे अनमोल प्राणांचे रक्षण करण्यासाठी *आरोग्य तुमचे काळजी आमची* या सामाजिक बांधिलकीतून निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा च्या माध्यमाने माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, पाचोरा भडगाव तथा सर्व शिवसेना पदाधिकारी बांधवांच्या समवेत दिनांक 23/10/2023 सोमवार रोजी सकाळी 10:00 वाजता जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा करण्यात आला.
यावेळी ताईसो म्हणाल्या की, पाचोरा व भडगाव शहर व तालुका मध्ये सध्या डेंग्यू, ताप मलेरिया सर्दी व खोकला अशा विविध आजारांच्या साथीने थैमान घातले आहे ही आजाराची साथ वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना राबविणे अतिशय आवश्यक आहे या साथीने अनेक कुटुंब व अनेक लोक त्रस्त आहे याची दखल घेऊन आम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रतिबंधात्मक सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात व ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकीतून जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचे नियोजन केले असून हा उपक्रम शहरात व ग्रामीण भागात दिनांक 23/10/2023 पासून सुरू करण्यात येत आहे आम्ही सामाजिक बांधिलकीतून कोरोनाचा काळ असो की शेतकरी असोत नागरिक असोत समुदायाच्या प्रबोधन आरोग्य व विकासाच्या दिशेने आतापर्यंत लक्षणीय योगदान दिलेले आहेत आज सुद्धा आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाचा जाणिवेतून आणि भूमिकेतून या साथीच्या रोगाची प्राधान्याने दखल घेऊन व पुढाकार घेत डास नियंत्रक फवारणी अभियान राबवित आहोत आपणास विनम्रतापूर्वक आवाहन करण्यात येते की, आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये, कॉलनी मध्ये परिणामकारक फवारणीसाठी सहकार्य करावे त्याचबरोबर आपण सर्वांनी दसरा व दिवाळी या शाळा सुटीच्या काळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लोकांच्या आरोग्याला आम्ही प्रथम प्रधान्य देतो आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश जी बाफना, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शहर प्रमुख अनिल सावंत,पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, गौरव पाटील, संदीप जैन, खंडू सोनवणे, संजय चौधरी, अभिषेक खंडेलवाल, गफार भाई, अजय पाटील, जीवन चौधरी, कैलास मिस्त्री, नामदेव चौधरी मंगेश सोमवंशी एम के ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे संचालक सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.