पाचोऱ्यात माजी विद्यार्थ्यांचा ‘ पुनर्मिलन सोहळा ‘ उत्साहात

पाचोऱ्यात माजी विद्यार्थ्यांचा ‘ पुनर्मिलन सोहळा ‘ उत्साहात

गो.से.च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : जुन्या आठवणींना उजाळा सन १९९१ – ९२ च्या दहावीच्या बॅचमधील १०० जणांचा व्हाट्सएप गृप आहे.सगळे चाळीशीपार आहेत…अन आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत.या सर्वांनी मिळून पाचोरा येथील शक्तीधाम येथे तिसरा पुनर्मिलन सोहळा आयोजित केला होता.या भेटीत सर्वांनी शाळेतील जुन्या आठवणींना ऊजाळा दिला.सर्वांची खूप दिवसानंतर भेटल्याची ओढ जाणवत होती.सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.सर्वजण गळाभेटी , हस्तांदोलन करत होते. शाळा सुटल्यानंतर प्रत्येकजण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन स्थिरावला.डॉक्टर , अभियंता , उद्योग , शिक्षण , राजकारण आदी विविध क्षेत्रात हे कार्यरत आहेत….परंतु या सर्वांची ३१ वर्षांची मैत्री कायम आहे. काही दिवसांपूर्वी निधन पावलेल्या सतिष वानखेडे , मयूर बडगुजर , दीपक अहिरराव या मित्रपरिवातील सदस्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नुकताच सहकुटुंब इराक दौरा करून परतलेला ताहेर बोहरी , आरोग्य पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उमेश महाजन व व्हाट्सगृपमध्ये स्वलिखित काव्यरचना सादर करणारा कविमित्र किरण सोनार यांचा शाल – श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.काश्मिरा शहा या मैत्रिणीने सर्वांना एकत्रित आणले.यावेळी मैत्री या विषयावरील विविध चित्रपट गीतांचे गायन करण्यात आले.सर्वांनी खूप गप्पा – गोष्टी , भरभरून हास्यविनोद करत आनंद लुटला. आयुष्यातील हरवलेले क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी दरवर्षी गेट – टुगेदर करायचे व पुन्हा पुन्हा भेटायचे असा संकल्प करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.स्वादिष्ट अल्पोपहाराने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राहुल तोतला , नितीन वसंतराव पाटील , योगेश संघवी , डॉ.नरेश गवंदे , किरण सोनार आदींनी परिश्रम घेतले… यावेळी कामिनी तांबोळी , अरुणा घोडके ,छाया पाटील या मैत्रिणी तर राजेश ठाकरे ,अभय पाटील , निर्मल अग्रवाल , सुधीर पाटील , विवेक हिरे ,राजू पंडीत पाटील , नितीन यशवंत पाटील ,भूषण देशमुख व सौ.भुवनेश्वरी देशमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील यांनी केले.